Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मला लगीन करायचं’ म्युझिक अल्बम प्रकाशित

Date:

काही दिवसांपासून मानसी नाईक लग्न करतेय का? मानसी नाईक लग्नाच्या बेडीत अडकतेय का? मानसी कोणाशी लग्न करतेय? अशी कुजबूज मनोरंजन क्षेत्रात सुरु होती. मानसीच्या लगीनघाईचा खुलासा नुकताच उलगडला तो ‘मला लगीन करायचं’ या म्युझिक अल्बमच्या प्रकाशन सोहळ्यात. नानूभाई जयसिंघानी यांच्या ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘मला लगीन करायचं’ या धमाकेदार म्युझिक अल्बमच्या निमित्ताने रंगलेला  मानसीच्या लग्नाचा अनोखा प्रमोशन फंडा सुपरहिट ठरला असून हे गाणं प्रदर्शनापूर्वीच खूप लोकप्रिय ठरलंय. या म्युझिक अल्बमच्या प्रकाशनासाठी त्यांची संपूर्ण टीम लग्नाच्या थाटामाटात अवतरली होती.

 

या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे यात ‘डान्सिंग क्वीन’ मानसी नाईक सोबत ‘कॉमेडी बादशहा’ जॉनी लिवर आणि ‘डीआयडी’ फेम सिद्धेश पै या तिघांनी प्रथमच एकत्र ताल धरला आहे. शिवाय जॉनी लिवर यांनी प्रथमच मराठी रॅप स्टाईलमध्ये ‘मला लगीन करायचं’ या गीताचा मुखडा गायला आहे. तिघांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे हा अल्बम खूपच देखणा झालाय. मराठी आणि पाश्चिमात्य संगीताच्या फ्युजनमध्ये काहीतरी नवीन करायचं या विचारातून या गीताची निर्मिती झाली आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘मला लगीन करायचं’ या अल्बमची निर्मिती, दिग्दर्शन व कोरिओग्राफी अशी तिहेरी जबाबदारी सिद्धेश पै यांनी सांभाळली आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानसी नाईकने या गीतात जॉनी, सिद्धेश व १२ डान्सर मुलींसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला आहेच; शिवाय या गीतातील प्रत्येकाचे लूक आणि स्टाईल डिझाईन केले आहेत.

 

रोशनी भालवणकर आणि मानवेल गायकवाड लिखित या गीताला संगीतकार स्वरूप भालवणकर यांनी संगीत दिलं असून स्वरूप भालवणकर सोबत आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध झालं आहे. या अल्बमचे छायाचित्रण किरण गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा दिपेश हिंगु यांची तर कलादिग्दर्शन प्रणय व प्रितेश यांनी केलंय. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद झाल्याची भावना मानसी नाईकने या निमित्ताने व्यक्त केली. जॉनी लिवर यांनी देखील काम करताना खूप धमाल अनुभव आल्याचे सांगितले. सिद्धेश पै याने देखील ‘व्हिडिओ पॅलेस’ने इतक्या दिमाखदार स्वरुपात हा अल्बम प्रदर्शित केल्याबद्दल नानूभाई जयसिंघानी यांचे आभार मानले.

 

येत्या लग्नसराईत ‘मला लगीन करायचं’ हे गीत नक्कीच धुमाकूळ घालेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....