शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल … उद्धव ठाकरे

Date:


शिवसेना पक्षप्रमुखांचे कार्य व लढा गौरवास्पद !आज व ऊद्याही सोबत रहाणार…. साहित्यिक अर्जुन डांगळे, मेधा कुलकर्णी, कवी अरूण म्हात्रे, नीरजा ,डा.महेश केळुसकर ,हेमंत कर्णिक, रवींद्र पोखरकर आदि अनेकांची सदिच्छा भेट

मुंबई दि.१४ : शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरविणारा असेल असे विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे साहित्यिक आणि अभ्यासू महाराष्ट्रिय सदस्यांसोबत आयोजित बैठकीत केले. अनेक साहित्यिक, लेखक-कवी व महाराष्ट्र अभ्यासू गटाने उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या गढूळ राजकीय परिस्थितीवर सर्व साहित्यिक आणि अभ्यासू नागरिकांनी दुःख व्यक्त करत साहित्यिक अस्वस्थ आहेत परंतु तुम्ही केलेले काम व आताचे प्रयत्न ऊद्धव ठाकरे यांचे बाबत आदर वाढविणारे आहेत. आम्ही आपल्या सोबत आहेत हे सांगायलाच ही सदिच्छा भेट असल्याचे कवयित्री नीरजा यांनी सांगितले.

याबैठकीत ऊद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, संघर्षाच्या काळात आपण सर्व आमच्यासोबत आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्या सर्वांचा उपयोग मला मराठी भाषा भवन उभे करण्यात करायचा आहे. यासंदर्भात वारंवार मला आपल्या भेटी घेण्याची इच्छा होती परंतु कोव्हिडंच्या काळात शक्य झाले नाही. परंतु आपण यापुढे भेटीत सातत्य ठेवु तसेच मराठी भाषा भवन आणि आपले साहित्य पुढील पिढीला देण्यासाठी कटिबद्ध राहू असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.
रंगभूमीची परंपरा जोपासणारे दालन उभारण्यासाठी सर्व साहित्यिकांनी साथ देण्याचे आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले.

सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सोबत असलेले लोक आपले गुलाम राहिले पाहिजे अशी भावना सध्या देशात दिसत आहे. प्रादेशिक पक्ष किंबहुना प्रादेशिक अस्मिता नष्ट करण्याचा विडा काही लोकांनी उचला आहे.मी मुळात राजकारणी नाही, मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते पंरतु परिस्थितीनुसार व जिद्दीने मुख्यमंत्री झालो होतो त्यात देखील चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ऊद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

यावेळी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. याबैठकीचे नियोजन विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले होते. भविष्यात साहित्यिक, लेखक- कवी यांचे नाते वृद्धींगत करण्याचे आवश्यक ती पाऊले ऊचलली जातील असे आश्वासन डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

या अनौपचारिक बैठकीत साहित्यिक अर्जुन डांगळे व उपस्थित साहित्यिक यांनी सध्याच्या वातावरणाबाबत साहित्यकही कृतिशील असल्याचे सांगितले. आज सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्याचा, विरोधकांना संपवण्याचा डाव खेळला जात आहे. अशा वेळी अस्वस्थ होणार्‍या अनेक लेखक कवींना महाविकास आघाडीकडून थोड्या आशा होत्या. त्यामुळेच धर्माच्या नावावर देशात विद्वेष पसरवण्याच्या काळात आघाडीच्या सर्व लोकांसोबत तसेच मराठीला आणि महाराष्ट्राला जपणार्‍या उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाधिकारशाही न मानणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे सारे संवेदनशील लेखक कवी आहेत हे सांगण्यासाठी ही सदिच्छा भेट घेतली असल्याचे उपस्थित साहित्यिकांनी व अभ्यासू गटाच्या सदस्यांनी सांगितले.

त्याचबरोबर अभ्यासू महाराष्टीय गटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हवी ती मदत करण्याचे आश्वासन मेधा कुळकर्णी यांनी यावेळी दिले. यावेळी डॉ.महेश केळुसकर, नीरजा, अरुण म्हात्रे, संदेश भंडारे, प्रा.महेन्द्र भवरे,योगीराज बागुल, रमेश शिंदे, मंदाकिनी पाटील, योगिनी राऊळ, अमोल नाले, विनय शिर्के, दिलीप सावंत, दिपक कांबळी, मिटिंगला
‘अभ्यासू महाराष्ट्रीय’ गटाचे स्वाती वैद्य, नेहा राणे, सविता दामले, मनाली गुप्ते, मृणालिनी जोग, हेमंत कर्णिक, मेधा कुळकर्णी, उत्पल व बा, तुषार गायकवाड, रवींद्र पोखरकर, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

मुंबई--नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

बेकायदा होर्डिंग्जने गिळले महापालिकेचे १८७ कोटी तर अधिकृत होर्डिंग्जने देखील दिला ८०० कोटीचा फटका ?

पुणे- महापालिकेच्या हद्दीत गेल्या ७ वर्षापासून बेकायदा १५०० होर्डींग्जने...

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२६: उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले. महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरूस्तीचे कामे वीजराज्यभरात सध्या सुरु आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.