पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २० मध्ये असणाऱ्या डॉ. नायडू हॉस्पिटलला या ठिकाणी प्रभागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे नगरसेवक अरविंद शिंदे, लताताई दयाराम राजगुरू, चांदबी नदाफ आणि प्रदीप गायकवाड यांनी त्यांच्या विकास निधीमधून प्रत्येकी १५ लाख रुपये याप्रमाणे ६० लाख रुपयांचे व्हेंटिलेटर भेट दिले.
त्याचबरोबर कोरोना या जीवघेण्या महामारीची तिसरी लाट संभाव्य येण्याची शक्यता गृहीत धरून डॉ. नायडू हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन प्लांटची निर्मिती यासर्वांच्या प्रयत्नातून केली आहे. त्यामुळे यापुढे या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. प्रभागांमध्ये विकास कामे ही नेहमी होतच असतात व यापुढेही होतच राहतील. परंतु, प्रभागातील नागरिकांचा जीव हा महत्त्वाचा असल्याने या कामाला प्राधान्य देण्यात आल्याचे या नगरसेवकांनी सांगितले