पुणे – पुण्यातील आघाडीची रियल इस्टेट डेव्हलपर- व्हॅस्कॉन इंजिनियर्सने आज घोषणा केली, की व्हॅस्कॉन इंजिनियर्सची (बीएसई – 533156/एनएसई – व्हीएएससीओएनईक्यू/आयएसआयएन) ५० टक्के संयुक्त भागिदारी असलेल्या अजंटा एंटरप्राइझेसने ,मेपलट्री इन्व्हेस्टमेंट पीटीई लि. (मेपलट्री) च्या खराडीस्थित एसपीव्हीला ,अंदाजे आठ एकर जमिनीची एकूण १७० कोटी रुपये मोबदल्यात यशस्वीपणे विक्री केली. १७ डिसेंबर २०१९ रोजी विक्री खताची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आणि संपूर्ण मोबदला मिळालेला आहे. अजंटा एंटरप्राइझेसकडे विकासासाठी ८ लाख चौरस फुट जमीन शिल्लक असून त्याचा काही भाग विकासाअंतर्गत आहे.
नुकत्याच झालेल्या या व्यवहाराविषयी व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. चे अध्यक्ष श्री. आर वासुदेवन म्हणाले, ‘मला जाहीर करताना आनंद होत आहे, की या जमीन व्यवहारामुळे आमच्या कंपनीची विकास क्षमता लक्षणीय प्रमाणात विकसित झाली आहे. कंपनीसाठी ही असामान्य कामगिरी असून त्यातून मिळालेली रक्कम मोठ्या रकमेचे कर्ज कमी करण्यासाठी व पुढील विकासासाठी वापरली जाणार आहे. येत्या काही वर्षांत आमचा व्यवसाय उच्च- विकास क्षेत्रात प्रवेश करेल याची मला खात्री वाटत असून या एकंदर घडामोडीमुळे आम्ही पुढील कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत.’
पुणेस्थित व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. ही भारतातील आघाडीच्या ईपीसी कंपन्यांपैकी एक असून ती असेट- लाइट रियल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहे. चालू आर्थिक वर्षातील ईपीसी कंत्राटे १५३९ कोटी रुपये आहे. सध्याची ईपीसी कंत्राट पुस्तिका २१७५ कोटी रुपयांची असून त्यात २०४९ कोटी रुपयांच्या बाह्य ईपीसी कंत्राटांचा आणि १२५ कोटी रुपयांच्या आमच्या अंतर्गत रियल इस्टेट लाँच कंत्राटांचा समावेश आहे. स्थावर मालमत्ता क्षएत्रात ३५ लाख चौरस फुट जागा विकासाअंतर्गत असून एकूण अपेक्षित विक्री अंदाजे २००० कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. या जागेचा काही भाग विकासाअंतर्गत असून शिल्लक जागेचा विकास येत्या २ ते ३ वर्षांत टप्प्याटप्प्याने लाँच केला जाईल.
व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.बद्दल
व्हॅस्कॉन इंजिनियर्स ही आघाडीची नोंदणीकृत स्थावर मालमत्ता कंपनी आणि आता फॉर्च्युन नेक्स्ट 500 कंपनी असून तिचे मुख्यालय पुण्यात आहे. ३० वर्षांचा अनुभव असलेल्या या कंपनीने आतापर्यंत ५० दशलक्ष चौरस फुटांचे मिळून एकूण २०० पेक्षा जास्त प्रकल्प तयार केले असून निवासी, औद्योगिक, आयटी पार्क्स, मॉल्स व मल्टीप्लेक्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेयर सेंटर्सचा समावेश आहे. हे प्रकल्प भारतातील ३० पेक्षा जास्त शहरांत ईपीसीसह उभारलेले तसेच कंपनीचे स्वतःचे स्थावर मालमत्ता प्रकल्प आहेत. यापुढेही ईपीसी आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण कंपनीने ठेवले आहे.