लंडन –ब्रिटीनच्या पंतप्रधान टेरिजा मे यांनी दिवाळीनिमित्त हिंदूंना हृदयपूर्वक शुभेच्छा दिल्या, यावेळी त्या म्हणाल्या की, दिवाळीचा सण आयुष्य कसं जगावं ते सांगतो, या सणासुदीला हिंदू संस्कृतीचे सर्वोत्तम रूप पाहता येते. अग्रणीचे अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यावसायिक हिंदुजा ब्रदर्स यांच्या निवासस्थानी अलिकडेच (20 ऑक्टोबर रोजी) दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभात एका संदेशाचे वाचन करण्यात आले, यामध्ये टेरिजा म्हणाल्या की, दिवाळीच्या निमित्ताने आयुष्याकडे बहारदार पद्धतीने पाहता येते, आदर-सन्मान यांची शिकवण देतानाच, भविष्य बदलताना गतकाळात घडलेल्या गोष्टींचा आवश्यक तो आदर ठेवला पाहिजे.
ब्रिटनच्या पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाल्या की, दिवाळी हा सण जगण्याचा उत्सव साजरा करणारा सण आहे, जो हिंदु संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ रूप आपल्याला दाखवतो. ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या विदेश मंत्री प्रीती पटेल यांनी हा संदेश वाचला. पंतप्रधान सध्या ब्रुसेल्समध्ये असून, त्या आमच्या देशाच्या हितासाठी ब्रेक्झिटबाबत वाटाघाटी करण्याची शर्थ करत आहेत, असे पटेल यांनी यावेळी सांगितले. आपल्या संदेशात प्रधानमंत्री असेही म्हणाल्या की, येथे ब्रिटन आणि युरोपातील जनजीवनात हिंदु समाजाने मोठे योगदान दिलेले आहे. त्या म्हणाल्या की- संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या विविध धार्मिक उत्सवांमुळे आमची संसकृत अधिक समृद्ध झाली आहे.
ब्रिटनचे विदेश सचिव बोरिस जॉन्सन या निमित्ताने म्हणाले की, “माझ्या सासूबाई भारतीय आहेत, त्यांचं नाव दीप आहे – दीप म्हणजे प्रकाश. आणि दिवाळी म्हणजेच माझ्या सासूबाईंचा सण साजरा करण्यासाठीची संधी आहे.’’ ते पुढे म्हणाले की, – आमचा देश आणि ब्रेक्झिट याबद्दल मीडियामध्ये बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत, यामुळे थोडे औदासिन्यही येते. याच काळात हा समृद्ध दिव्यांचा सण साजरा करत आहोत, यामुळे आमच्या मनातील अंधःकार दूर होऊन नवीन आशेचा किरण निर्माण होणार आहे.
हिंदुजा ग्रूपचे सह-अध्यक्ष जी. पी. हिंदुजा, म्हणाले की, “दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, या सणामुळे भूतकाळातील सर्व गोष्टी विसरता येतात, आपल्या शत्रूंना माफ करता येते, चुकीच्या घडलेल्या गोष्टी विसरता येतात, इतकंच नाही तर याच काळात नवीन अध्याय सुरू करता येतो.
बेरोनेस संदीप वर्मा यांनी नमूद केले की, दिवाळी हा सण आता पूर्णपणे ब्रिटनचाच सण झाला आहे. प्रत्येक वर्षी हा सण आम्ही अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि हा आनंदोत्सव सगळ्यांसाठी खुला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
ब्रिटनमधील भारताचे हाय कमिशनर वाय के सिन्हा या निमित्ताने आपले विचार मांडले.