Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शंभराहून अधिक दिवाळी अंकांत राजेंद्र सरग यांची व्‍यंगचित्रे

Date:

पुणे   – प्रत्‍येकाला हसायला आवडतं. विनोद आणि व्‍यंगचित्र म्‍हणजे हास्‍याचा खजिनाच. असे हास्‍यखजिने म्‍हणजे विनोदी दिवाळी अंक. मराठी माणसाचे आनंदनिधान म्‍हणजे दिवाळी अंक होय. दिवाळी साजरी करण्‍याइतकाच आनंद दिवाळी अंक वाचतांनाही होतो. दिवाळी अंक हातात पडला रे पडला की त्‍यातील व्‍यंगचित्रे सर्वात आधी आपले लक्ष वेधून घेतात. यंदाच्‍या वर्षी आवाज, जत्रा, शतायुषी सह  शंभराहून अधिक दिवाळी अंकांत राजेंद्र सरग यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे समाविष्‍ट झाली आहेत.

दिवाळी सण हा उत्‍साहाचा, आनंदाचा, नवे विचार देणारा, नवी दिशा दाखवणारा,अंधारातून प्रकाशाकडे नेणारा नवा जोश, नवा जोम घेऊन येणारा सण. मराठी संस्‍कृतीचा, साहित्‍याचा विचार करता राज्‍याच्‍या इतर कोणत्‍याही भागात आढळणार नाही, अशी दिवाळी अंकांची परंपरा महाराष्‍ट्राला लाभली आहे. दिवाळी निमित्‍त विविध विषयांवर अंक प्रकाशित होतात, यामध्‍ये विनोदी दिवाळी अंकांनी आपले स्‍वतंत्र अस्तित्‍व जपले आहे. या विनोदी दिवाळी अंकांमध्‍ये सातत्‍याने व्‍यंगचित्रांद्वारे हजेरी लावणा-या व्‍यंगचित्रकारांमध्‍ये राजेंद्र सरग यांचे नाव प्राधान्‍याने घ्‍यावे लागेल. त्‍यांनी विविध विषयांवर व्‍यंगचित्रे रेखाटली असून विशेषकरुन सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर अधिक भर दिला आहे. हसवता-हसवता सामाजिक संदेश देणारी प्रभावी व्‍यंगचित्रे कमीत कमी तपशिलामध्‍ये मांडण्‍याचे त्‍यांचे कसब कौतुकास्‍पद म्‍हणावे लागेल. राज्‍यातील जवळपास प्रत्‍येक जिल्‍ह्यातील एका तरी दिवाळी अंकांमध्‍ये त्यांची व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत.

या वर्षी  आवाज, मार्मिक,अलका, अनुराग, अपेक्षा, अधिष्‍ठान, अहिल्‍या किरण, अंबर, ऑल द बेस्‍ट, आक्रोश, अक्षरवेल, भूमिका, भालचंद्र, भक्‍तीधारा, बालरंजन, भन्‍नाट, भाविसा,भ्रमर, चिंतन आदेश, भीमातीर, छोट्यांचा आवाज, दिलासा, दिवाळी आवाज, धमाका, हास्‍यधमाल, दलितवाणी, धमालधमाका, गाववाला, फीरकी, गगनभरारी, जनशांती, कजरी, हास्‍यानंद, हेर, लेखी संवाद, लोकटाइम्‍स, जत्रा, महाराष्‍ट्राची जत्रा, धमाल जत्रा, नगरदीप, निशांत, निरंजन, नीहार, प्रभात, पार्टनर, प्रतिबिंब, पारंबी, लवअंकुश, रंभा, रागिनी,  रोखठोक, रामबाण, संयम, समतोल, श्रीसाम्राज्‍य, स्‍नेहसखी, शब्‍दगांधार, सह्याद्री, सामना, रत्‍नभूमी, सांजसुयोग, साहित्‍यरंजन, शिवतेज,  शिवमार्ग, वर्ल्‍ड सामना, इब्‍लीस, हाहाहा, रत्‍नावली, कोकणमिडीया, लोकटाइम्‍स, कृषिरंग, महाराष्‍ट्र प्रवाह, पुणे प्रतिष्‍ठान, प्रवाह, रजधूळ, साहित्‍य शिवार, साहित्‍य संपदा, शतायुषी, सत्‍याग्रही, संवाद, वारसा, झाडाझडती, थरार,प्रज्‍वलित मने, पुष्‍कराज, स्‍नेहदा, युवावार्ता, परिसर, संगमसंस्‍कृती, वेदांतश्री यासह 100 हून अधिक दिवाळी अंकांमध्‍ये व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत. याशिवाय विविध दैनिकांच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात येणा-या दिवाळी विशेषांकातही त्‍यांची व्‍यंगचित्रे समाविष्‍ट झाली आहेत.

राजेंद्र सरग हे मार्च 1987 ते व्‍यंगचित्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्‍यांना देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता गौरव पुरस्‍कार, दिवाळी वार्षिक संघटनेचा उत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकार पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात आले आहे. याशिवाय महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार, महाराष्‍ट्र पोलीस दलाच्‍या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2004 पासून सन 2007 पर्यंत  सलग 4 वर्षे प्रथम पुरस्‍कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन 2007 चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार, दक्षतातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2008 मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, रत्‍नभूमीतर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2008 मध्‍ये प्रथम पुरस्‍कार, रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन 2003 चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार, व्‍यंगचित्र क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल सन 2004 मध्‍ये गौरव पुरस्‍कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि  महात्‍मा  गांधी मिशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2008-2009 चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. सन 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल आकाशवाणी मुंबईच्‍या वतीने स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, अहमदनगर येथील  महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने साहित्‍य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल 2017 मध्‍ये गौरव तसेच नागपूर येथे जानेवारी 2017 मध्‍ये आयोजित अखिल भारतीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रास उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थांच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.  याशिवाय त्‍यांनी रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे.  विविध दिवाळी अंकांत त्‍यांची 11 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.  जून  2017 पासून ते पुणे येथे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. कार्यालयीन कामाचा व्‍याप सांभाळून त्‍यांनी व्‍यंगचित्रांचा छंद जोपासला आहे.

(राजेंद्र सरग  9423245456)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...

साक्षीभावात राहिल्यास जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी : अभयकुमार सरदार

‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन पुणे : साक्षीभाव साध्य झाल्यास...