नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील रुग्णालयात पासवान यांनी शेवटचा श्वास घेतला. पासवान याचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
23 ऑगस्टला दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये पासवान यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
3 ऑक्टोबरला पासवान यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते रुग्णालयात होते. दिल्लीच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते.
‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असं ट्विट चिराग पासवान यांनी केलंय.
बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती.
दरम्यान, बिहारच्या निवडणुकांच्या आधी पासवान यांचा मृत्यू होणे धक्कादायक असून त्याचा निवडणुकांवर मोठा परिणाम पडेल असे बोलले जात आहे. रामविलास पासवान यांच्या निदानाने देशाने एक मोठा दलित नेता गमावला आहे.