पुणे–किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक मानसी किर्लोस्कर यांना युनायटेड किंग्डमच्या (युके) पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स सभागृहात नुकतेच विशेष भाषण करण्याची संधी मिळाली. १७ व्या वार्षिक लंडन ग्लोबल कन्व्हेन्शन ऑफ आयओडी (इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स, इंडिया) परिषदेच्या सन्माननीय पाहुण्या या नात्याने त्यांनी भारत-युके ट्रेड रिलेशन्स (भारत-युके व्यापारी संबंध) या विषयावर प्रभावी भाषण दिले.
या परिषदेला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे उद्योग, सरकारी अधिकारी प्रेक्षकांना संबोधित करण्यासाठी या एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.
मानसी यांनी आपल्या भाषणाने या पाहुण्यांना प्रभावित केले आणि तितकाच जोरदार समारोपही केला. त्या म्हणाल्या, “समारोपादाखल मी म्हणते, की आमच्या दोन्ही राष्ट्रांतील आर्थिक संबंधांच्या भवितव्यात दोन्ही सरकारांची प्रबळ इच्छा हा निश्चितच निर्णायक घटक ठरणार असला तरी या इच्छेचा प्रामाणिकपणा आणि लोकसंबंधांची ताकदच सरकारांच्या निर्धाराला आकार देतील.”
परिणामकारक प्रशासन सुधारण्यासाठी कंपन्या सध्या मुकाबला करत असलेल्या काही सातत्यपूर्ण समस्या व आव्हानांवर चर्चा आणि मंथन करण्यासाठी या परिषदेने अनोखे व्यासपीठ मिळवून दिले.
तरुण आणि चैतन्यशील व्यवसाय नेतृत्व असलेल्या मानसी किर्लोस्कर यांना विविध विषयांवर भाषण देण्यासाठी आतापर्य़ंत अनेक प्रतिष्ठित मंचांकडून आमंत्रण आले आहे. उद्योजक घराण्याच्या एकुलत्या एक वारस म्हणून मानसी किर्लोस्कर यांना पेलावी लागणारी आव्हाने, कुटूंबाच्या व्यवसायाची दीडशे वर्ष जुनी परंपरा पुढे नेण्याबाबत त्यांचा ध्येय दृष्टीकोन, केअरिंग विथ कलर हा त्यांचा सामाजिक विना-नफा नवउद्योग, जपानशी संयुक्त सहयोगातून आणि जपानी पद्धतीने मिळालेल्या कठोर प्रशिक्षणातून शिकलेले धडे आदी विषयांचा त्यात समावेश आहे.
त्यांच्या नव-उद्योगाचे ध्येय शाळांमधील वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे रुप बदलण्याचे असून त्या दिशने पहिला चाचणी प्रकल्प चालू महिन्यात बंगळुरु येथे सुरु होत आहे.
इतकेच नव्हे, तर मानसी यांना गेल्या दोन वर्षांत व्यवसाय व उद्योजकीय स्थापनांमधील उत्कृष्टता व यशाबद्दल प्रतिष्ठित असे व्यवसाय व नेतृत्व पुरस्कार मिळाले आहेत.
मानसी किर्लोस्कर सध्या किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड व टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालक, किर्लोस्कर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या संचालक असून जपानी कंपनीशी सहयोगादरम्यान मिळालेल्या कठोर प्रशिक्षणानंतर तेथे काम करत आहेत. त्यांनी रिअल इस्टेट कंपनी स्थापन करुन नवउद्योजक म्हणून एक मोठा निवासी प्रकल्प पूर्ण करुन दाखवला आहे.
कामाशी कटिबद्धतेबरोबरच मानसी चित्रकलेसाठीही वेळ काढतात. चित्रकला ही त्यांची उत्कट आकांक्षा आहे. त्या प्रशिक्षित अशा खोल-सागर पाणबुड्या असून त्यांना गिरीभ्रमण, प्रवास, तसेच जवळचा मित्रवर्ग व परिवारासमवेत संपर्कात राहायला आवडते.