पुणे : युनायटेड किंग्डममधील (मूळ पुणेकर) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक व ब्रँडिंग तज्ज्ञ, तसेच प्रसिद्ध सक्सेस कोच निलेश (उर्फ निलेश वाघचौडे) यांनी लिहीलेल्या ‘4 इझी स्टेप्स टु स्विच फ्रॉम जॉब टु सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअरशिप’ या पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. सक्सेस कोच निलेश यांनी याआधी ‘हाऊ टु बिकम ए सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअर’ या विषयावरील अनेक कार्यशाळा घेतल्यानंतर हे पुस्तक लिहीले आहे. ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेले हे पुस्तक एखाद्याला नोकरी काळजीपूर्वक सोडून यशस्वी उद्योजक बनण्यास मदत करण्यासाठी निर्माण केलेले बहुधा पहिलेच आणि सर्वाधिक प्रात्यक्षिक पुस्तक असावे.
यासंदर्भात सक्सेस कोच निलेश म्हणाले, “अनेक लोकांना नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याची इच्छा असते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्यापैकी मोजकेच लोक यशस्वी होतात. एखाद्या नोकरीत आयुष्यभर काम करत बसण्यापेक्षा उद्योजकतेकडे नवे करिअर म्हणून बघण्याचा वाढता कल आजच्या व्यावसायिकांमध्ये दिसून येत आहे. माझ्या पुस्तकामधून मी अशा सर्वांना त्यांच्या साहसात यशस्वी बनण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करुन मदतीचा दृष्टीकोन ठेवला आहे. त्याचबरोबर नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या चुका करणे टाळावे व त्यांच्या पैशाची बचत व्हावी यासाठी मी त्यांना योग्य व्यवसायाची व्यूहरचनाही दिली आहे, जी त्यांचा नफा वाढवेल.”
ते पुढे म्हणाले, “उद्योजकता हा समाजात गरजेचा असलेला बदलाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. समाजातील सर्वसाधारण कल म्हणजे आपण लोकांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्यास प्रोत्साहन देतो, परंतु फार थोडे लोक इतरांना उद्योजक बनण्यासंदर्भात मदत करतात, हे दुर्दैव आहे. उद्योजकता व्यक्तीला नोकरीच्या अनेक संधी निर्माण करण्यास, जीवने बदलून टाकण्यास आणि अभिनवता व आर्थिक प्रगतीकडील मार्ग खुला करण्यास सक्षम बनवते. उद्योजकता समाधान, स्वातंत्र्य आणि हे जग उत्तम ठिकाण बनवण्यासाठी योगदानाची भावना देते. जगाची एक-तृतियांश लोकसंख्या मूलभूत उर्जेपासून वंचित आहे आणि जागतिक लोकसंख्येचा ७१ टक्के हिस्सा आजही दिवसाला १० डॉलरपेक्षा कमी उत्पन्नावर गुजराण करतो. या स्थितीत मानवी संस्कृतीसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांवर उत्तरे शोधून काढण्यात उद्योजकता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. एकंदरीत आपल्या समाजाला किंवा जगाला अशा व्यक्तींची गरज आहे, जे अत्यंत आवश्यक असा बदल घडवण्याचे स्वप्न बघतात आणि धाडस दाखवतात.”