Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘तुमचं आमचं सेम नसतं’ रंगभूमीवर

Date:

प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं.. अस कितीही म्हटलं तरी बऱ्याचदा ते तसं कधीच नसतं.. हे सांगणारं ‘तुमचं आमचं सेम नसतं’ हे एक नवकोर विनोदी नाटक रंगभूमीवर येऊ घातलंय. ‘यश क्रिएशन’ आणि ‘परीस प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकाची निर्मिती सौ. अर्चना निलेश चव्हाण आणि के.प्रतिमा करीत असून दिग्दर्शन नितीन कांबळे करताहेत. प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करण्याच्या उद्देशाने निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकाचे आकर्षण म्हणजे हरहुन्नरी विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करतोय.

दिग्दर्शक नितीन कांबळे यांनीच ‘तुमचं आमचं सेम नसतं’ नाटकाचे लेखन आणि गीत लिहिली आहेत. संगीत व पार्श्वसंगीताची साथ तृप्ती चव्हाण यांनी दिली असून गायक साईराम अय्यर, तृप्ती चव्हाण, करण यांनी ती गायली आहेत. या नाटकातून सिद्धार्थ पगारे, गौरी जोगळेकर, नितीन कुर्लेकर, कविता मगरे, आदित्य भालेराव, अभिजीत दुलगज आणि वरद चव्हाण हे कलाकार एकत्र आले आहेत. नेपथ्य अशोक पालेकर व हरीश आहीर करणार असून प्रकाश योजना अनिकेत कारंजकर, नृत्य – संतोष भांगरे, निर्मिती सूत्रधार – संजय कांबळे, संगीत संयोजन- विशाल बोरुलकर, रंगभूषा- किशोर पिंगळे, पोस्टर डिझाईन – केतन कदम व वेशभूषा संजय (बापू) कांबळे अशी इतर श्रेयनामावली आहे.

‘तुमचं आमचं सेम नसतं’चा शुभारंभाचा प्रयोग बुधवार १५ मार्चला सायं. ४:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...