जिल्हा माहिती अधिकारी व व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली !

Date:

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन झाले. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शासन प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. मनमिळावू म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता.

नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्टस् , कामर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये दीवंगत सरग यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांची पदोन्नती होणार होती. त्यामुळे मीडिया जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यगचित्रकाराला आपण मुकलो आहोत.

राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची शक्ती मिळो, प्रार्थना !

छगन भुजबळ
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री, नाशिक


पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

▪️अजित पवार, उपमुख्यमंत्री

कार्यतत्पर,मनमिळावू, शांत, सुस्वभावी म्हणून त्यांचा प्रशासन, माध्यम व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच श्री.राजेंद्र सरग यांचा करोना काळातील उत्कृष्ट कामाबद्दल गौरवही करण्यात आला होता.
राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यंगचित्रकाराला आपण मुकलो आहोत. त्यांच्या अशा अकाली जाण्याने माहिती व जनसंपर्क विभागाचे निश्चितच अपरिमित असे नुकसान झाले आहे.
राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो,सर्वांनीच परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःची, स्वतःच्या कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, जनतेनेही शासन-प्रशासन वारंवार देत असलेल्या सूचनांचे पालन करावे .

माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...