पुणे विभागातील 17 लाख 91 हजार 239 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 63 हजार 180 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 5 : पुणे विभागातील 17 लाख 91 हजार 239 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 63 हजार 180 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 499 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 442 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 88 हजार 780 रुग्णांपैकी 10 लाख 61 हजार 449 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 65 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.49 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 21 हजार 565 रुग्णांपैकी 2 लाख 8 हजार 316 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 872 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 78 हजार 965 रुग्णांपैकी 1 लाख 69 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 422 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 963 रुग्णांपैकी 1 लाख 66 हजार 396 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 6 हजार 869आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 907 रुग्णांपैकी 1 लाख 85 हजार 118 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 271 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 307 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1025 सातारा जिल्ह्यात 616, सोलापूर जिल्ह्यात 657, सांगली जिल्ह्यात 628 तर कोल्हापूर जिल्ह्यात 381 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 659 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 396, सातारा जिल्हयामध्ये 1123, सोलापूर जिल्हयामध्ये 631, सांगली जिल्हयामध्ये 852 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 657 रुग्णांचा समावेश आहे.
(टिप :- दि. 4 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
**