महापालिका ताब्यात घेण्याची वलग्ना करणाऱ्यांनी आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत- भाजपचा पलटवार

Date:

पुणे-पुणे मनपा ताब्यात घेण्याची वलग्ना करणाऱ्यांनी आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी प्रसिद्धी साठी चे पोरखेळ बंद करावेत असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि संघटन सरचिटणीस राजेश पांडे तसेच शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या जगताप यांच्या प्रसिद्धीपत्रकाला भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी देखील पत्रकानेच उत्तर दिले आहे यात त्यांनी म्हटले आहेकी,’एकच गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटायला लागते, याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष धादांत खोट बोलत असतात. पण पुणेकर सुज्ञ आहेत. राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणाला ते चांगलेच ओळखून आहेत, भाजप प्रदेशाध्यक्ष
आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी काय काम केले हे विचारणाऱ्यांनी कधीतरी चंद्रकांतदादांच्या कोथरूड मतदारसंघात यावे आणि दादांनी केलेल्या अफाट सेवाकार्याचा अभ्यास करावा.अर्थात यांच्या पक्षाचं अस्तित्वही जिथे नाही तिथे कोणी काय काम केलं हे त्यांना कसं समजणार !?
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फक्त माध्यमात सापडतात, कामाच्या नावाने शून्य !?
पुणे मनपा ताब्यात घेण्याची वलग्ना करणाऱ्यांनी आधी सर्व जागांसाठी उमेदवार शोधावेत
आणि मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करावी. राष्ट्रवादी च्या शहर अध्यक्षांनी प्रसिद्धी मिळवण्याचे पोरखेळ बंद करून स्वतःच्या पक्षातील अस्तित्वाकडे अधिक लक्ष द्यावे असा सल्ला भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...