पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे.’कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली करीत जगताप यांनी केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे असे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.
मुळीक यांनी असेही म्हटले आहेकी,एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजित दादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेलं नाही. प्रत्येक पुणेकर कोरोना विरोधात लढत असताना, पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा बालिश प्रकार जगताप यांनी केला आहे. जगताप भानावर आले असतील तर त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी. असे शेवटी मुळीक यांनी म्हटले आहे.