मग ‘हे’ देशमुख नेमके कोण?, देवेंद्र फडणवीसांचा पवारांना खोचक सवाल

Date:

मुंबई-परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर लावलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र यानंतर तत्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पवारांचा हा दावा खोडून काढत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देशमुख यांनी 15 तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओच शेअर केला आहे.


फडणवीसांनी ट्विट करत पवारांचा दावा खोडून काढला

परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप लावल्यानंतर भाजपकडून सातत्याने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यानंतर शरद पवारांनी देशमुखांची पाठराखण करत सर्व आरोप फेटाळले होते. दरम्यान आता फडणवीसांनी ट्विट करत पवारांचा दावा खोडून काढला आहे. त्यांनी देशमुखांचा 15 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला. ‘देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?’, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.पवारांनी दावा केला होता की, वाझे आणि देशमुखांची भेट झालीच नाही
शरद पवारांनी स्पष्टीकरण देत अनिल देशमुख हे आरोप करण्यात आले त्या काळात रुग्णालयात असल्याचेही म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयामध्ये होते असे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंह यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. मी रुग्णालयामधून ही माहिती घेतली आहे. देशमुख रुग्णालयामध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड असल्याचेही देशमुख म्हणाले. तसेच 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांचा होता. असे असुनही सिंह कोणत्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत? असा सवालही पवारांनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

मुंबई | प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...