’15 तारखेला डिस्चार्ज झाल्यावर हॉस्पिटलच्या बाहेरच पत्रकारांशी बोललो’, देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला अनिल देशमुखांचे उत्तर

Date:

मुंबई-आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देशमुखांवरील सर्व आरोप फेटाळून लावले. ‘देशमुख हे आरोप करण्यात आलेल्या काळात रुग्णालयात होते’ असे पवार म्हणाले. यावर फडणीसांनी पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विट करत मग हे देशमुख कोण असा खोचक सवाल केला होता.आणि पवारांना चुकीची , दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप केला होता . आता यावर अनिल देशमुखांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?
15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ फडणवीसांनी ट्वीट केल्यानंतर देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे. देशमुख म्हणाले की, ‘मला कोविड झाल्यामुळे मी 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या काळात नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. 15 फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते.त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. मी हॉस्पिटल बाहेरच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. 28 फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊस येथे बैठकीला गेलो होतो’ असे अनिल देशमुख म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचा देशमुखांचा 15 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर केला. ‘देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?’, असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

काय म्हणाले होते पवार?
शरद पवारांनी स्पष्टीकरण देत अनिल देशमुख हे आरोप करण्यात आले त्या काळात रुग्णालयात असल्याचेही म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयामध्ये होते असे कागदपत्रंही त्यांनी सादर केले. सिंह यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. मी रुग्णालयामधून ही माहिती घेतली आहे. देशमुख रुग्णालयामध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड असल्याचेही देशमुख म्हणाले. तसेच 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांचा होता. असे असुनही सिंह कोणत्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत? असा सवालही पवारांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...

हडपसरमध्ये लहान मुलांसाठी क्रीडा नर्सरी प्रकल्प- ११.६१ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे : हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यालगत आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर...