पुणे : कोरोना साथीच्या काळात अजोड कामगिरी केल्याबद्दल महापालिकेच्या दळवी रुग्णालयाला भेट देऊन तेथील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि अन्य स्टाफचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आभार मानले.
या रुग्णालयातील पोस्ट कोविड आणि अन्य उपचारांच्या तयारीचा आढावा आमदार शिरोळे यांनी घेतला. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष मुळे, रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. रेखा कोकर्डे आणि अन्य स्टाफ उपस्थित होता. साथीच्या काळात लढावूवृत्तीने सर्वांनी काम केले, अशा शब्दात आमदार शिरोळे यांनी प्रशंसा केली.
येत्या काही दिवसात या रुग्णालयातील शेवटच्या कोविड रुग्णाला डिस्चार्ज दिला जाईल. परत एकदा सामान्य रुग्णालय म्हणून दळवी रुग्णालय कार्यरत होईल.