राज्याला कोरोना लशीचे १९.५ लाख डोस मिळणार : खा. बापट

Date:

पुणे.८: ( प्रतिनिधी ) कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. खा.बापट यांनी नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्राला कोविडचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील.असे आश्वासन हर्षवर्धन यांनी दिले. अशी माहितीही बापट यांनी दिली ते पत्रकारांशी बोलत होते. बापट म्हणाले आज म्हणजे आठ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यात सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी तसेच रुग्णालयातील बेडसची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी.असे निवेदन आज मी केन्द्रीय आरोग्य मंत्री यांना दिले. पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. तथापि शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख वायल्स इतकी लस गरजेची आहे .लशीचा पुरवठा कमी झाल्याने. या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.शहरातील अशा २१५ खाजगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही आम्ही सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. याकडे मी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले .कोविड लसीकरणाकरिता खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.तसेच वेंटीलेटरची संख्या वाढवावी यासाठी मी केन्द्राकडे आग्रह धरला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...