पुणे- भर पावसातही ना देणारा मागे सरला ,ना पाहुणे मागे हटले , ना घेणाऱ्यांचे हाथ थकले… कोरेगाव पार्क येथील संत गाडगेबाबा शाळेच्या पटांगणावर कोविड च्या काळात आर्थिक फटका बसलेल्या गरजूंना विविध प्रकारची मदत करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला .प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवाचे नगरसेवक उमेश गायकवाड आणि त्यांचे बंधू दिनेश गायकवाड यांच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांचा सन्मान, रिक्षाचालकांना सीएनजी कुपनचे वाटप आणि लोककलावंत व गरजूंना शिधावाटप इ. सेवाकार्यक्रम राबवण्यात आले.पुण्याचे खासदार गिरीश बापट , भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , आ. सुनील कांबळे ,आ. राहुल कुल , माजी मंत्री दिलीप कांबळे सभागृह नेते गणेश बिडकर,माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,राजेश पांडे तसेच योगेश पिंगळे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहिमेसाठी देणगी स्वरुपात रु. १० लाख. रुपये यावेळी देण्यात आले. बुध्दवासी दयानंद सोनकांबळे साहेब (सहआयुक्त, ढोलेपाटील क्षेत्रिय कार्यालय) व श्रध्दास्थान कालकथीत नवनाथमामा कांबळे यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. रिक्षाचालकांना CNG Gas चे कुपन वाटप तसेच रेशन किट वाटपकरण्यात आले. विकलांग गरजूंना रेशन किट कलाकारांना रोख मानधन व रेशन किट वाटप करण्यात आले.महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. भर पावसात पुरेपूर उत्साहाने झालेला एवढा मोठा सोहळा अचंबित करण्याजोगाच ठरला .