शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष ,माजीआमदार अनिल भोसले यांची १३ एकर जमीन बाजार समितीने सहा कोटी ४१ लाखाला घेतली विकत

Date:

पुणे-शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचेअध्यक्ष , माजी आमदार अनिल भोसले यांची १३ एकर जमीन बाजार समितीने सहा कोटी ४१ लाखाला विकत घेतली आहे. सोलापूर रस्त्यावरील कोरेगाव मूळ येथील १३ एकर जमिनीचा लिलाव करण्यात आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने लिलावात सहा कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांना १३ एकर जमीन खरेदी केली आहे.शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. या जमिनीचा लिलाव करण्यात आला. यामध्ये बाजार समितीने ही जमीन विकत घेतली आहे. शहराचा विस्तार वाढत असून प्रस्तावित वर्तुळाकर मार्ग, शेतकरी आणि बाजार घटकांच्या दृष्टीने सोयस्कर असा उपबाजार बांधण्याचे निश्चित करण्यात आले. अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या बाजार आवार उपलब्ध असल्यास शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. त्यादृष्टीने बाजार समितीकडून जमिनीची पाहणी करण्यात येत होती, असे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी नमूद केले.गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाच्या आवारात गाजर, मटार, मिरची, फळभाज्या, कांदा, बटाटा असा शेतीमाल विक्रीस पाठविण्यात येतो. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कोरेगाव मूळ येथील जमीन उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात आहे. त्यामुळे परराज्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस पाठविणे सोपे होईल. वाहतूक खर्चात बचत होईल तसेच गुलटेकडीतील मुख्य बाजारावर पडणारा ताण कमी होईल, या सर्व बाबींचा विचार करुन बाजार समिती लिलावात जमीन खरेदी केली. या जागेवर बाजार आवाराची निर्मिती झाल्यास बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडेल, गरड यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...