पुणे विभागातील 16 लाख 85 हजार 732 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 17 लाख 67 हजार 976 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 12 : पुणे विभागातील 16 लाख 85 हजार 732 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 67 हजार 976 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 45 हजार 558 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 36 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 64 हजार 73 रुग्णांपैकी 10 लाख 35 हजार 407 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 666 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.31 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 3 हजार 212 रुग्णांपैकी 1 लाख 89 हजार 59 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 247 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 906 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 67 हजार 507 रुग्णांपैकी 1 लाख 60 हजार 560 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 503 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 56 हजार 998 रुग्णांपैकी 1 लाख 42 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 275 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 76 हजार 186 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 794 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 622 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 78, सातारा जिल्ह्यात 786, सोलापूर जिल्ह्यात 291, सांगली जिल्ह्यात 945 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 522 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 123 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 162, सातारा जिल्हयामध्ये 939, सोलापूर जिल्हयामध्ये 413, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 119 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 490 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 46 लाख 75 हजार 255, सातारा जिल्ह्यामध्ये 10 लाख 475, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख 98 हजार 591, सांगली जिल्हयामध्ये 9 लाख 49 हजार 910 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 लाख 15 हजार 990 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 14 लाख 63 हजार 44 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 67 हजार 976 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 11 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)