पुणे विभागात आज ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 63 हजार 254

Date:

पुणे विभागातील 11 लाख 98 हजार 757 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 13 लाख 88 हजार 454 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 14 : पुणे विभागातील 11 लाख 98 हजार 757 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 88 हजार 454 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 63 हजार 254 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 26 हजार 443 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.34 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 52 हजार 413 रुग्णांपैकी 8 लाख 48 हजार 364रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 89 हजार 220 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 829 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 31 हजार 160 रुग्णांपैकी 1 लाख 2 हजार 9 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 612 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 24 हजार 396 रुग्णांपैकी 1 लाख 4 हजार 108 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 893 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 395 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 96 हजार 413 रुग्णांपैकी 76 हजार 292 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 334 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 787 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 84 हजार 72 रुग्णांपैकी 67 हजार 984 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 195 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 445ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 131, सातारा जिल्ह्यात 2 हजार 26, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 625, सांगली जिल्ह्यात 1 हजार 354 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 309 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 13 हजार 131 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 537, सातारा जिल्हयामध्ये 863, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 548 , सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 306 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 877 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 24 लाख 92 हजार 940, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 75 हजार 448, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 48 हजार 642, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 42 हजार 227 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 7 हजार 818 नागरिकांचा समावेश आहे
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 76 लाख 76 हजार 284 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 13 लाख 88 हजार 454 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 13 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेचा लोहगावच्या 7 RMC प्लांटवर जोरदार हथोडा

पत्रकार परिषद घेऊन पुणे आरएमसी असोसिएशनने दिला होता इशारा...

ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे अपयश फडणविसांचे…

मुंबई, दि. १५ एप्रिल २०२६ महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे...

“महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश”

सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार...