पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 750 ,एकुण 4 हजार 751 रुग्णांचा मृत्यू

Date:

पुणे विभागातील 1 लाख 24 हजार 755 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 74 हजार 256 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.19 :- पुणे विभागातील 1 लाख 24 हजार 755 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 256 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 750 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.6 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 29 हजार 569 रुग्णांपैकी 99 हजार 124 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 245 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 200 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.50 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 929 रुग्णांपैकी 4 हजार 449 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 220 आहे. कोरोनाबाधित एकूण 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 186 रुग्णांपैकी 9 हजार 600 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 15 रुग्णांपैकी 3 हजार 502 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 283 आहे. कोरोनाबाधित एकूण 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 557 रुग्णांपैकी 8 हजार 80 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 38 आहे. कोरोनाबाधित एकूण 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 60 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 543, सातारा जिल्ह्यात 336, सोलापूर जिल्ह्यात 357, सांगली जिल्ह्यात 437 तर कोल्हापूर जिल्ह्यात 387 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 37 हजार 184 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 74 हजार 256 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 18 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयटी’ क्षेत्रातील मनुष्य बळाच्या समस्यां बाबत,’व्हाइट टी शर्ट रीव्होल्युशन’चे राज्यव्यापी ‘सर्वेक्षण अभियान’..!

डीजीटल युगांत 'कार्पोरेट कर्मचाऱ्यांच्या समस्या' देशाच्या उत्पादकतेशी संबंधित… गोपाळदादा...

लॉरेन्स बिश्नोई गँगवर FBI ची धडक :अमेरिका-कॅनडासह अनेक देशांमध्ये 50 ठिकाणी छापे टाकून 24 जणांची धरपकड, पुण्यातही 4 पकडले

अमेरिकेच्या तपास यंत्रणा एफबीआयने (FBI) पहिल्यांदाच गँगस्टर लॉरेन्स, गोल्डी...

कोयना धरणात सर्वाधिक ३६.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

कृष्णा खोऱ्यात पावसाची दमदार हजेरी; धोम बलकवडीत १६८ मिमी,...