सत्ताधारी माजी उपमहापौरच म्हणतात .. महापालिकेत गरीब कामगारांची होतेय पिळवणूक

Date:

पुणे- पुणे तिथे काय उणे असे म्हणतात , सत्तेत सह्भागी झालेले माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी आज गंभीर स्वरूपाचा आरोप करणारे … ज्यास कोणी मागणी म्हणेल असे पत्र-प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे . हि बाब आजवर स्थायी समितीच्या लक्षात कशी आली नाही हा मोठा गहन प्रश्न आहे . गेली ३ महिने कंत्राटी कामगारांचे पगारच दिलेले नाहीत ज्याची संख्या ३ हजारावर आहे . आणि बिगारी पदावर विविध खात्यात काम करणारे हे कर्मचारी तरीही जीव मुठीत धरून काम करत आहेत. पुण्यात मागील 6 महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगार, अतिक्रमण, सुरक्षा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन त्वरित द्या, तसेच त्यांना 5 लाख विमा कवचही द्या, असा प्रस्ताव माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी बुधवारी स्थायी समितीला सादर केला आहे.

कामात दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व खातेप्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन रोखले जावे, तसे आदेश देण्याची विनंतीही या प्रस्तावात करण्यात आली आहे.विविध विभागात काम करणारे जवळपास 3500 कंत्राटी कामगार आहेत. विविध कोविड सेंटर, दवाखाने, प्रसूतीगृह, कोरोनाच्या आस्थापना, पुणे महापालिकेच्या समाज विकास विभाग मार्फत समूह संघटिका मागील 6 महिन्यांपासून सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या लाभ होत नाही.

एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिने झाले वेतनही देण्यात आले नाही. याहून पुढे या कर्मचाऱ्यांना कामावरही घेण्याचे आदेश देखील दिलेले नाही. संबधीत खातेप्रमुख केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत आहे. त्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी तात्काळ लक्ष घालून अतिरिक्त आयुक्त, खातेप्रमुख यांना तात्काळ आदेश देऊन या कामगारांची रखडलेले वेतन त्वरित द्यावी, लवकरात लवकर त्यांना कामावर घ्यावे, असेही डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून भाजपाबरोबर इथे सत्तेत सहभागी झालेल्या नगरसेविका सोनाली लांडगे यांची सही आहे.हे आणखी विशेष म्हणावे लागणार आहे.

गेली ४ वर्षांपासून अशा कंत्राटी आणि बोगस वाटतील अशा कामगारांचा प्रश्न ‘मायमराठी ‘ने वारंवार लावून धरला . कोणतेही नियुक्तीपत्र, आय कार्ड नसताना चक्क मिळकत कर विभागात बसून संगणकावर काम करत लोकांशी संवाद साधून मिळकत कर जमा करणाऱ्या एकास ‘माय मराठी’ ने रंगे हाथ पकडून दिल्यावर .. अशा कामगाराना नेमते कोण ? हा प्रश्न निर्माण झाला होता . त्यानंतर कंत्राटी कामगारांची पिळवणूक समोर येऊ लागली . काही विरोधी पक्षांनी त्यावर आवाज उठविला .पण एकूणच प्रशासन आणि काही विशिष्ट लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पिळवणूक प्रकार सुरु असल्याचे आरोप कोणी केले तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मध्यरात्रीनंतर महापौर मंजुषा नागपुरे नदीकाठी; नागरिकांना सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या...

खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडले, मुठा नदीत २७ हजार २०३ क्युसेक्सने विसर्ग

चारही धरणांचा पाणीसाठा १३.९७ टीएमसीवर; अवघ्या १३ तासांत १.७६...

खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले..

खडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजल्यापासून मुठा नदीत १,६८४ क्युसेक...

रस्त्यांचे झाले नाले..केंद्रीय मंत्री मोहोळ अधिकाऱ्यांना म्हणाले,आजवर तुम्ही काय केले.. ?

आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा घेतला आढावा पुणे (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि...