गुवाहाटीला अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ईशान्य भारत परिषदेच्या 70 व्या पूर्णसत्राची बैठक

Date:

गुवाहाटी -केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज आसामच्या गुवाहाटी इथं ईशान्य भारत परिषदेच्या 70 व्या पूर्णसत्राची बैठक झाली. केंद्रीय सांस्कृतिक कार्य, पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री, जी किशन रेड्डी तसेच सहकार आणि ईशान्य भारत विकास राज्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते. तसेच ईशान्येकडील राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. 

ईशान्य भारताच्या विकासाला आधीच्या सरकारांचे प्राधान्य नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने गेल्या 8 वर्षांत ईशान्येत शांतता प्रस्थापित करण्यासाठी, तसेच संपर्क वाढवण्यासाठी आणि या प्रदेशाच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, असं अमित शाह यावेळी म्हणाले.

ईशान्येकडील भाषा, संस्कृती, पाककृती आणि पोशाख यांना, संपूर्ण भारत आपला वारसा मानतो, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे अमित शाह म्हणाले. गेल्या 8 वर्षांत सरकारने ईशान्येकडील सर्व समस्यांचे मूळ शोधून त्या सोडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेतीचे महत्त्व देखील अमित शाह यांनी यावेळी अधोरेखित केले. नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती ही भारत सरकारसाठी प्राधान्याची बाब आहे, असं सांगत नैसर्गिक उत्पादनांच्या  प्रमाणीकरणासाठी अमूल आणि इतर पाच सहकारी संस्थांचे विलीनीकरण करून बहुराज्यीय सहकारी संस्था तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी पूरमुक्त आणि अंमली पदार्थमुक्त ईशान्य भारत निर्माण करणे महत्त्वाचे आहे. पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देतानाच, जलविद्युत प्रकल्पांचा उद्देश केवळ ऊर्जा निर्माण करणे हा नसून त्यांचा उपयोग पूर प्रतिबंधातही केला जाऊ शकतो, असे अमित शाह म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...

गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय...