नवी दिल्ली-
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड प्रकल्पा संबंधीच्या संयुक्त कार्यगटाची सहावी बैठक आज झाली. रेल्वेचे मुख्य आयुक्त आणि रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. त्रिपाठी आणि जपानचे राजदूत सतोशी सुझुकी यांनी या बैठकीचे संयुक्तपणे अध्यक्ष पद भूषविले.
या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांवरील निर्णयांना मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या गटाने हाय स्पीड प्रकल्पाशी संबंधित सहकार्याच्या विविध मुद्यांवर देखील चर्चा केली.