नुकताच जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा अभिनित ‘फोर्स २’या चित्रपटचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून याआधीही आलेल्या ‘फोर्स’मध्ये जॉनने एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती आणि यात तो एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारतो आहे. अभिनय देव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
निशीकांत कामत यांनी याआधीच्या ‘फोर्स’चे दिग्दर्शन केले होते. तर जेनेलिया डिसुझाने त्यात भूमिका साकारली होती. आता या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत सोनाक्षी सिन्हाही मुख्य भूमिकेत आहे. सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात एक रॉ एजंट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती अॅक्शन लूकमध्ये बघायला मिळणार आहे. पाकिस्तान आणि भारतीय रॉ एजंट यांच्यावर ही कथा आधारित असल्याचे ट्रेलरवरून कळते. हा चित्रपट शहीद झालेल्या जवानांना समर्पित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. असे अनेक चित्रपट याआधीही येऊन गेले आहेत आणि त्या चित्रपटांनी नेहमीच मनोरंजन केले आहे. त्यामुळे जॉनचा हा चित्रपट मनोरंजन करेल असेच चित्र आहे.