‘आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज’ ला आंतरशालेय टेनिसबॅाल क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स’ने आंतरशालेय टेनिसबॅाल क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. 19 वर्षा खालील मुलींच्या गटात ही स्पर्धा झाली. जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी पुणे आणि पुणे महानगरपालिका शिक्षणमंडळ यांच्यासंयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
आझम कॅम्पसच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये ‘आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स’ संघाने ‘अंजुमन इस्लाम इंग्रजी माध्यम’ संघाचा 28 धावांनी पराभव केला.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी.ए. इनामदाऱ, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुनव्वर पीरभॅाय, महाविद्यालयाच्या प्राचार्य आएशा शेख तसेच ‘आझम स्पोर्टस अॅकेडमी’चे संचालक गुलजार शेख यांनी यशस्वी खेळाडूचें अभिनंदन केले.
नाणे फेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना ‘आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स’ने 6 षटकांमध्ये नाबाद 58 धावा केल्या. रिदा शेख ने 25 तर मृदूला रूद्राक्ष ने 19 धावा केल्या. प्रतिउत्तर देताना ‘अंजुमन इस्लाम इंग्रजी माध्यम’ संघाने 6 गडयांच्या मोबदल्यात 30 धावा केल्या. यामध्ये आफ्रीन शेख ने 12 तर हुमा खान ने 11 धावा केल्या.