अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थेमधील शिक्षकांना लवकरात लवकर कोव्हिडं लस उपलब्ध करून द्यावी-नगरसेवक आदित्य माळवे

Date:

पुणे:- शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.त्याचबरोबर लसीकरण प्रक्रियेलाही जोरदार सुरुवात झाली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता खंबीरपणे उभे राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे.

पुणे शहरात लसीकरण सुरू झाल्यावर पहिल्या दोन टप्प्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या आरोग्य – महानगरपालिका कर्मचारी, कचरावेचक अशा सर्वांना प्राधान्य देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आम्हालाही लस द्या अशी मागणी खासगी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी केली आहे. पुणे महापालिकेचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी शिक्षकांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत पत्र दिले. महापालिका शाळेतील शिक्षकांनाही लस देण्यात आली होती. मात्र खासगी शिक्षण संस्थेचा याबाबत कुठलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थेमधील शिक्षकांना लवकरात लवकर कोव्हिडं लस उपलब्ध करून द्यावी. अशी विनंती आदित्य माळवे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडपसरमध्ये लहान मुलांसाठी क्रीडा नर्सरी प्रकल्प- ११.६१ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे : हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यालगत आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर...

विविधांगी रंगावलीतून पुण्यात अवतरली खंडेरायाची जेजुरी

'जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारले खंडोबा चरित्र ;...

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुणे, दि. ३० : महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी...

महाराष्ट्रदिनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला विचार अभियान

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’ पुणे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने...