रिक्षाचालकांना अन्नधान्य व आर्थिक मदतीची गरज छावा मराठा संघटनेची शासनाकडे मागणी

Date:

पिंपरी-कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील प्रत्येक घटकाला झळ सोसावी लागत असून, यातून रिक्षाचालकही सुटलेले नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील जवळपास ऐंशी हजाराहून अधिक रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांना आर्थिक मदत आणि अन्नधान्याची मदत करावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
           रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी भारतातही लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे
सर्वच बाबतीत मर्यादा आलेल्या आहेत. शासनाने रिक्षालाही बंधने घातली आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी रिक्षामध्ये फक्त एकाच प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे. तसेच रिक्षा स्टँडवरही दोन तीन रिक्षा उभ्या करू दिल्या जातात. पोलिसांच्या या आवाहनाला रिक्षाचालक पूर्ण सहकार्य करीत आहेत. मात्र, संपूर्ण संचारबंदीमुळे प्रवाशीच नसल्याने रिक्षा बंद ठेवाव्या लागत आहेत. परिणामी रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. साधारणपणे ऐंशी हजार रिक्षा आहेत. एका रिक्षावर अवलंबून असलेले चार लोक पकडले तर सव्वातीन ते साडेतीन लाख लोकांचा उदरनिर्वाह चालतो. या लोकांना आज आधाराची गरज आहे. दैनंदीन खर्च, आजारपण, कर्जाचे हप्ते, घरभाडे यासाठी पैसे कुठून आण्याचे, असा प्रश्न सतावत आहे.  या संकटातून वाचविण्यासाठी रिक्षा चालकांना शासनाने अन्नधान्य व आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...