पुणे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जीवनगाथा असलेल्या आणि
पुण्यातील किशोरवयीन मुलांनी एकत्र येऊन ‘स्वातंत्र्यवीरायण’या
नाटकातील चमूने सावरकरांच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील
पुतळ्याला अभिवादन केले . पोस्टरचे अनावरण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील स्वातंत्रवीर सावरकरांच्या खोलीत करण्यात आले.
‘प्रतीक मुव्हिज’ प्रस्तुत ‘स्वातंत्र्यवीरायण’ हे सावरकरांच्या जीवनावरील नाटक आहे. यावेळी ‘स्वातंत्र्यवीरायण’नाटकातील कलाकार अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे, आदित्य बीडकर, पूर्वा देशपांडे, ऋत्विक व्यास, अमित कुलकर्णी, पार्थ कुलकर्णी, राजस कुलकर्णी उपस्थित होते .
प्रसिद्ध कलाकार अथर्व कर्वे याने किशोरवयीन कलाकारांना एकत्र करून हे नाटक रंगमंचावर आणायचे ठरवले आहे . या नाटकाचा पहिला प्रयोग भरत नाट्य मंदिर येथे दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आहे .
नाटकाचे लेखक अथर्व देशपांडे ,शार्दूल अनसिंगकर असून दिग्दर्शन अथर्व कर्वे यानेच केले आहे . डॉ . डी . एन . गंजेवार हे निर्मिता आहेत .
अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे, आदित्य बीडकर, पूर्वा देशपांडे, ऋत्विक व्यास, अमित कुलकर्णी, सोहम देवधर ,पार्थ कुलकर्णी, ऋत्विक व्यास ,राजस कुलकर्णी यांच्या भूमिका या नाटकात आहेत . नेपथ्य सोनम चव्हाण यांचे असून वेशभूषा पूर्वा देशपांडे यांची आहे .