Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जलद न्याय व सुरक्षा या मागणी साठी दिल्लीत गांधी जयंतीदिनी महामोर्चा : संजय सोनवणी

Date:

पुणे-

नागरिकांना सुरक्षा व जलद न्याय मिळण्यासाठी पोलिस व न्यायव्यवस्थेसाठी निधी वाढवून द्यावा व अधिक सक्षम मनुष्यबळ पुरवावे या मागणी साठी २ आक्टोबर रोजी, दुपारी एक वाजता, गांधी स्मारकापासून ते पोलिस मुख्यालयापर्यंत स्वर्ण भारत पार्टी मोर्चा काढणार आहे, अशी माहिती पक्षाध्यक्ष संजय सोनवणी यांनी दिली. या संदर्भात पक्षाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते, परंतू त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने या मागण्यांना घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलनाची ही सुरुवात करत आहोत असे सोनवणी यांनी सांगितले.

देशात गुन्हेगारीचा विस्फोट झाला असून बलात्कार, दलितांवरील अत्याचार ते बालगुन्हेगारी याचे प्रमाण वाढलेले आहे. प्रत्येक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अथवा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी पुरेसे पोलिसबळ भारतात उपलब्ध नाही. दर लाख नागरिकांमागे किमान २२२ पोलिसांची आवश्यकता असतांना भारतात केवळ १४७ पोलिस आहेत. त्यांच्याकडून सक्षमतेची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. भारतात जलद न्याय हे एक दिवास्वप्न बनले आहे कारण केवळ १८००० न्यायाधीश आहेत. यामुळे प्रलंबीत खटल्यांचे प्रमाण तीन कोटींपेक्षा अधिक गेले असून रोज त्यात भरच पडते आहे. त्यामुळे न्यायाधीश व न्यायालयांची संख्याही पुरेशा प्रमाणात वाढवली गेली नाही तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील उरला सुरला विश्वासही उडेल असे सोनवणी म्हणाले.

सरकारची कायदा व सुव्यवस्था राखणे व त्वरित न्यायाची हमी देणे ही कामे प्रमुख असतांना सरकार मात्र नको त्या आणि तोट्यात चालणा-या उद्योगव्यवसायांत रममाण आहे. लोकांचे जीवन मात्र असुरक्षिततेने ग्रासलेले आहे. सरकारने तत्काळ उद्योगव्यवसायांतून बाहेर पडत आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करावे ही या मोर्चाची प्रमूख मागणी आहे असे सोनवणी म्हणाले. या मोर्चात स्वत: संजय सोनवणी, पक्षाचे उपाध्यक्ष आलोक कुमार, सचीव विद्यूत जैन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मृणाल ढोलेपाटील व पक्षाचे पाचशे कार्यकर्ते सामील होणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...