स्त्री जन्माचा गर्व बाळगा
नॉर्मली, अनेक बायका ‘पुढच्या जन्मी बाईचा जन्म नको’ अशी प्रार्थना करताना दिसतात. पण मी म्हणेन कि ‘मिळालेल्या या स्त्री जन्माचा आपण गर्व करायला हवा. कारण एकाहून अधिक भूमिका निभावणारी स्त्री हि एकमेव व्यक्ती आहे. मुलगी, बहिण, प्रेयसी, मैत्रीण, बायको, सासू आणि सून अशा अनेक भुमिकेत ती जगत असल्यामुळे, माझ्यादृष्टीने स्त्री जन्म म्हणजे एका कलाकाराचा जन्म आहे. खरे पहिले तर, एका स्त्रीची सर्वात मोठी वैरीण एक स्त्रीच असते, ‘या गोजिरवाण्या घरात’ हे माझे नाटक स्त्रीसक्षमीकरणावर भाष्य करते. आपल्या सुनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी तिची सासू तिच्या पाठीशी खंबीर उभी राहते. आजच्या आधुनिक विचारसरणीच्या युगात हेच सूत्र प्रत्येक स्त्रीने अवलंबवायला हवे. तेव्हाच स्त्री जन्माचा विकास होईल, आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यात बदल करायला हवा, एका स्त्रीच्या पाठीशी एका स्त्रीनेच खंबीर उभे राहायला हवे.करण त्यामुळेच समाजातील अर्ध्या अधिक समस्या या दूर होतील. जेणेकरून ‘पुढच्या जन्मी मला बाईचाच जन्म दे’ अशी प्रत्येक स्त्री देवाकडे साकडे घालू शकेल.
सुप्रिया पाठारे- (अभिनेत्री)
______________________________ ______________________________