अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत ए अँड ए शार्क्स संघाचा दुसरा विजय

Date:


पुणे, 20 एप्रिल 2022 – डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत साखळी फेरीत ए अँड ए शार्क्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात  प्रसाद जाधव(1-17 व 27धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ए अँड ए शार्क्स संघाने आयकॉन टायगर्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला. तर, अभिषेक ताम्हाणे(नाबाद 42धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आयकॉन टायगर्स संघाने टीटी टायटन्स संघाचा 32धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. 
अन्य लढतीत चारुदत्त कुलकर्णी(नाबाद 24 व 1-8) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्नो लेपर्ड्स संघाने ऍक्वा रायडर्स संघाचा 5 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. 
निकाल: साखळी फेरी:आयकॉन टायगर्स: 6षटकात 6बाद 60धावा(शंतनू शोरी 21(11,4×4), पराग चोपडा नाबाद 16(10), अभिषेक ताम्हाणे 13, नीरव शहा 1-8, प्रसाद जाधव 1-17)पराभूत वि.ए अँड ए शार्क्स: 4.3षटकात 2बाद 63धावा(नंदन कामत नाबाद 30(13,6×4), प्रसाद जाधव 27(12,2×4,2×6), गंधार मराठे 1-20);सामनावीर-प्रसाद जाधव; ए अँड ए शार्क्स संघ 6गडी राखून विजयी;
आयकॉन टायगर्स: 6षटकात बिनबाद 66धावा(अभिषेक ताम्हाणे नाबाद 42(16,5×4,2×6), पराग चोपडा नाबाद 19(20,1×4,1×6)) वि.वि.टीटी टायटन्स: 6षटकात 5बाद 34धावा(मयूर जुन्नरकर 12, शंतनू शोरी 2-7,रोहित मेहेंदळे 1-7, अभिषेक ताम्हाणे 1-4);सामनावीर-अभिषेक ताम्हाणे; आयकॉन टायगर्स संघ 32धावांनी विजयी;
स्नो लेपर्ड्स: 6षटकात 2बाद 58धावा(चारूदत्त कुलकर्णी नाबाद 24(14,2×4), नचिकेत जोशी 18, शार्दूल आंबेकर 1-8)वि.वि.ऍक्वा रायडर्स: 6षटकात 4बाद 53धावा(शैलेश बंगले 17, तेज दिक्षित 14, अजिंक्य मेहता 14, चारूदत्त कुलकर्णी 1-8);सामनावीर-चारूदत्त कुलकर्णी; स्नो लेपर्ड्स संघ 5धावांनी विजयी;
ए अँड ए शार्क्स: 6षटकात 4बाद 61धावा(अंकुश जाधव 32(19,2×4,2×6), नंदन कामत 10, आशिष देसाई 2-6)वि.वि.मराठा वॉरियर्स: 6षटकात 5बाद 37धावा(नितीन हार्डीकर 17, नंदन कामत 3-3, आदित्य देशपांडे 1-6);सामनावीर-नंदन कामत; ए अँड ए शार्क्स संघ 24धावांनी विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...