पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारतच्या तिस-या मानंकीत करमान कौर थंडीने सिंगापुरच्या स्टेफनी टान व झील देसाईने मिहिका यादवचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात दुस-या फेरीत तास सत्तावीस मिनिट चाललेल्या सामन्यात थायलंडच्या बिगर मानांकीत बुनयावी थामचायवातने ईस्त्राईलच्या अव्वल मानांकीत डेनिझ खाजान्युक 6-3, 6-1 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. तर स्वित्झरलॅंडच्या बिगर मानांकीत करीन केनेल हीने चायनीज तायपेच्या पाचव्या मानांकीत पी-ची ली चा 7-6(2), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.भारतच्या तिस-या मानंकीत कारमान कौर थंडीने सिंगापुरच्या बिगर मानांकीत स्टेफनी टानचा 6-3, 6-3 केला. तर झील देसाईने मिहिका यादवचा 7-5, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.
दुहेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांनी भारताच्या ऋतुजा भोसले व प्रांजला येडलापल्ली या जोडीचा 7-5, 7-5 असा तर ओमानच्या फातमा अल नभानी व करगिझस्थानच्या स्केनीया पालकीना यांनी तुर्कीच्या बेरफु सेंग्झी व स्वित्झरलॅंडच्या करीन केनेल यांचा 0-6, 6-4, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- दुसरी फेरी
बुनयावी थामचायवात(थायलंड) वि.वि डेनिझ खाजान्युक(ईस्त्राईल,1) 6-3, 6-1
जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2) वि.वि ऋतुजा भोसले(भारत) 6-4, 6-4
कारमान कौर थंडी(भारत,3) वि.वि स्टेफनी टान (सिंगापुर) 6-3, 6-3
वालेरीया स्त्राखोवा(युक्रेन,4) वि.वि साई संहिता चमर्थी (भारत) 6-3, 7-5
करीन केनेल(स्वित्झरलॅंड) वि.वि पी–ची ली(चायनीज तायपे, 5) 7-6(2), 6-1
एना वेसेलीनोवीक(मोन्टेनेग्रो,6) वि.वि फातमा अल नभानी(ओमान) 6-3, 6-3
तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,8) वि.वि महक जैन(भारत) 3-6, 6-3,6-1
झील देसाई(भारत) वि.वि मिहिका यादव(भारत) 7-5, 7-5
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
पी-ची ली(चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया,3) वि.वि ऋतुजा भोसले(भारत)/प्रांजला येडलापल्ली(भारत) 7-5, 7-5
फातमा अल नभानी(ओमान)/ स्केनीया पालकीना(करगिझस्थान) वि.वि बेरफु सेंग्झी(तुर्की)/ करीन केनेल(स्वित्झरलॅंड) 0-6, 6-4, 10-7
जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया)/ तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,4) वि.वि स्टेफनी टान(सिंगापुर)/ धृती वेणुगोपाल(भारत) 1-6, 6-1, 10-5
झील देसाई(भारत)/ बुनयावी थामचायवात(थायलंड) वि.वि प्रेरणा भांब्री(भारत)/निधी चीलुमुला(भारत) 4-6, 7-5, 10-2