अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत आय.ईरा, श्रीजी डेविहलपर्स संघांची आगेकुच

Date:

पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब  क्रिकेट करंडक स्पर्धेत आय.ईरा संघाने सचिन पायगुडे स्पोर्टस् संघाचा तर श्रीजी डेविहलपर्स संघाने अथा मिडीया संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर मगरच्या 132 धावांच्या बळावर आय.ईरा संघाने सचिन पायगुडे स्पोर्टस् संघाचा 113 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना आय.ईरा संघाने 20 षटकात 5 बाद 211 धावा केल्या. 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रसन्न भोईटेच्या अचूक गोलंदाजीपुढे सचिन पायगुडे स्पोर्टस् संघ 16.5 षटकात सर्वबाद 98 धावांत गारद झाला. यात संतोष पडवळने 35 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सागर मगर सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत सुरज शिंदेच्या नाबाद 77 धावांच्या जोरावर श्रीजी डेविहलपर्स संघाने अथा मिडीया संघाचा सर्व 10 गडी राखून सहज पराभ केला. पहिल्यांदा खेळताना अथा मिडीया संघाना 20 षटकात सर्वबाद 96 धावा केल्या. यात कुणाल रामटेकेने 29 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 96 धावांचे लक्ष श्रीजी डेविहलपर्स संघाने  सुरज शिंदेच्या नाबाद 77 व स्वप्निल मुंगेल नाबाद 21 धावांच्या बळावर केवळ 7.3 षटकात एकही गडी न गमावता 101 धावांसह सहज पुर्ण केले. सुरज शिंदे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

आय.ईरा- 20 षटकात 5 बाद 211 धावा(सागर मगर 132(67), गोकुळ देशमुख 20, संतोष पडवळ 2-39, नवनाथ साठे 1-34) वि.वि सचिन पायगुडे स्पोर्टस्- 16.5 षटकात सर्वबाद 98 धावा(संतोष पडवळ 35, नवनाथ साठे 19, प्रसन्न भोईटे 36-4, नवनाथ साठे 1-34) सामनावीर- सागर मगर

आय.ईरा संघाने 113 धावांनी सामना विजय मिळवला.

 

अथा मिडीया- 20 षटकात सर्वबाद 96 धावा(कुणाल रामटेके 29, श्रीराम कटकवार 20, कुणाल फणसे 3-15, पराग चितळे 1-16) पराभव वि श्रीजी डेविहलपर्स- 7.3 षटकात 0 बाद 101 धावा(सुरज शिंदे नाबाद 77, स्वप्निल मुंगेल नाबाद 21) सामनावीर- सुरज शिंदे

श्रीजी डेविहलपर्स संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...