पुण- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागात मुलांच्या गटात आदिनाथ कबड्डी संघाने आराध्या प्रतिष्ठान संघाचा 20-17 असा पराभव करत विजय मिळवला.
पिंपरी चिंचवड येथील ज्ञान प्रबोधीनी शाळा, निगडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आदिनाथ कबड्डी संघने आराध्या प्रतिष्ठान संघाचा 20-17 असा पराभव केला. आदिनाथ कबड्डी संघाकडून आदिनाथ घुलेने उत्कृष्ट चढाया करत 8 गडी बाद केले तर आकाश बर्गेने 5 गडी बाद करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. तद्पुर्वी उपांत्य फेरीत आदिनाथ कबड्डी संघाने कालभैरवनाथ कबड्डी संघाचा 28-23 असा पराभव केला.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्य फेरी
आदिनाथ कबड्डी संघ- 28(राजेश बोराडे 8, शिवम पवार 6) वि.वि कालभैरवनाथ कबड्डी संघ- 23(संकेत बेंद्रे 7, प्रसाद नखाते 5)