पुणे, 17 फेबुवारी 2021: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अभिराम निलाखे याने तर, मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अभिराम निलाखे याने विश्वजीत सणसचा 4-0, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. अभिराम हा बाळकृष्ण मंदिर येथे सातवी इयत्तेत शिकत असून पार्थ चिवटे टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाई हिने दुर्गा बिराजदारचा 4-0, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती राऊत आणि स्पर्धा निरीक्षक रेशम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
विश्वजीत सणस वि.वि.अद्विक नाटेकर(1) 6-5(5);
अभिराम निलाखे(2) वि.वि.मनन अगरवाल 7-0;
अंतिम फेरी: अभिराम निलाखे(2) वि.वि.विश्वजीत सणस 4-0, 4-1;
14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
देवांशी प्रभुदेसाई(3)वि.वि.मृणाल शेळके 7-4;
दुर्गा बिराजदार वि.वि.क्षीरीन वाकलकर(4)7-5;
अंतिम फेरी: देवांशी प्रभुदेसाई(3)वि.वि.दुर्गा बिराजदार 4-0, 4-1.