निसर्गाकडे जाण्याऐवजी स्वतः निसर्ग होण्याचा प्रयत्न करा-माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ 

Date:

पुणे : निसर्ग आपल्याला काहीही न मागता भरभरून देत असतो. मात्र, आजच्या जीवनशैलीत आपण निसर्गापासून दूर जात आहोत. मातीशी आपली नाळ जोडलेली असली पाहिजे. हॉटेलमधील कामकाजही निसर्गाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. निसर्गाचे महत्त्व ओळखून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे. निसर्गाकडे जाण्याऐवजी स्वतः निसर्ग होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले.

विश्वाह् क्रिएशन्स पब्लिकेशन्सतर्फे प्राचार्य डॉ. अजयकुमार राय लिखित ‘शाश्वत हॉटेल व्यवस्थापन : तत्त्वे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन गांधी भवन येथे करण्यात आले. या वेळी हॉटेल रॅडिसन ब्लू, खराडीचे महाव्यवस्थापक पंकज सक्सेना, प्राचार्य डॉ. अजयकुमार राय, अंजली अत्रे राय उपस्थित होते.

पंकज सक्सेना म्हणाले, हे पुस्तक अगदी योग्य वेळी प्रकाशित झाले आहे. सध्या संपूर्ण जग शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असून, भविष्यातील तापमानवाढीचे अंदाज अधिक गंभीर आहेत. त्यामुळे शाश्वतता हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय आहे. आता केवळ पाण्याचे संवर्धन करण्याचा विषय राहिलेला नाही, तर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची वेळ आली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाणी सहज उपलब्ध होणारे संसाधन राहिलेले नाही. त्यामुळे शाश्वतता हाच भविष्याचा मार्ग आहे. शाश्वतता म्हणजे केवळ प्लास्टिक निसर्गात फेकू नये, एवढाच मर्यादित विचार नाही, तर ही संकल्पना त्यापेक्षा खूप व्यापक आहे. शाश्वतता ही एका वेगळ्या स्तरावरील जीवनशैली आणि संस्कृती आहे.

या वेळी प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे हॉटेल उद्योगातील पर्यावरणपूरक कामकाजाची तत्त्वे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दिशा यांची माहिती दिली. निवेदक आणि बालसाहित्यिक अंजली अत्रे राय यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील पोलिसाकडूनच गांजाची तस्करी:तेलंगणात अटक ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तडकाफडकी निलंबन!

विश्रामबाग वाहतूक विभागातील नितीन शिंदेवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा; सेवेतून...

बजाज लाइफ इन्शुरन्सची गिफ्ट सिटीतून डॉलरमधील गुंतवणूक आणि विमा योजना; एनआरआयसाठी ‘ग्लोबल वेल्थ बिल्डर’ दाखल

सहा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फंडांचा पर्याय; जीवन विमा संरक्षणासह संपत्तीनिर्मितीची...

BHIM ॲपवरील प्रत्येक सातव्या व्यवहारातून गरजू मुलांच्या शिक्षणाला मदत; ‘गूंज’सोबत विशेष उपक्रम

‘मीठी दिवाळी’ मोहिमेअंतर्गत शालेय साहित्याचे संच उपलब्ध करून देणार;...

गरजू कुटुंबांसाठी पुण्यधाम ट्रस्टचा मोफत सामूहिक विवाह सोहळा; १२ डिसेंबरला कोंढव्यात आयोजन

आर्थिक अडचणींमुळे विवाहाचा खर्च करू न शकणाऱ्या कुटुंबांकडून अर्ज...