14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत रितिका मोरे, श्रीया देशपांडे यांचा मानांकित खेळाडूवर विजय

Date:

पुणे: नवसह्याद्री क्रीडा संकुल व एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रितिका मोरे व श्रीया देशपांडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

 

एरंडवणा येथील नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रितिका मोरे  हिने सहाव्या मानांकित प्रिशा शिंदेचा 6-1, 7-5 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. वैष्णवी सिंग हिने नाव्या भामिदीप्तीवर 6-2, 6-2 असा विजय मिळवला. श्रीया देशपांडे हिने तिसऱ्या मानांकित अलिना शेखचा 6-2, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.  

मुलांच्या गटात आर्यन घाटगे याने अर्जुन कीर्तनेचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(8), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत अवनीश चाफळे याने अथर्व राऊतचा 4-6, 6-3, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली.

 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 14 वर्षाखालील मुले:

पार्थ देवरुखकर(1) वि.वि.ओंकार शिंदे 6-3, 6-2;

अभिराम निलाखे(5) वि.वि.देव तुराकिया 6-3, 6-2;

आर्यन घाटगे वि.वि.अर्जुन कीर्तने 3-6, 7-6(8), 6-0;

अवनीश चाफळे वि.वि.अथर्व राऊत 4-6, 6-3, 6-0;

अद्विक नाटेकर(2) वि.वि.अभय नागराजन 6-4, 6-4;

 

14 वर्षाखालील मुली:

जुई काळे(1) वि.वि.अग्निमित्रा भट्टाचार्या 6-1, 6-1;

वैष्णवी सिंग वि.वि.नाव्या भामिदीप्ती 6-2, 6-2;

रितिका मोरे वि.वि.प्रिशा शिंदे(6) 6-1, 7-5;

श्रीया देशपांडे वि.वि.अलिना शेख(3)6-2, 6-1

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा

जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी पुणे, दि. १६:...

लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील-मुख्यमंत्री देवेंद्र...

फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना...

ओव्हरहेड केबल,अनधिकृत होर्डींग्ज प्रकरणी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या बेफिकिरीचा झाला पर्दाफाश

ओव्हरहेड केबल भूमिगत करण्यासाठी नियमावली करण्यास प्रशासनाला १० दिवसांची...