पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट प्रायोजित पहिल्या पीवायसी-बीकेटी निमंत्रित निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर मुंबईच्या वेदांत पानेसर याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत 4 गुणांसह आघाडी कायम ठेवली आहे.
पीवायसी बुद्धिबळ अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत चौथ्या फेरीत मुंबईच्या वेदांत पानेसर याने आपला शहर सहकारी सीएम ओम कदमचा पराभव करून 4 गुण प्राप्त केले. पुण्याच्या शंतनू भांबुरे याने कोल्हापूरच्या सम्मेद शेटेला बरोबरीत रोखले. सांगलीच्या आयएम समीर कठमाळे याने मुंबईच्या स्नेहल भोसलेचा पराभव करून 3गुण मिळविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: चौथी फेरी(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार):
वेदांत पानेसर(मुंबई)(4गुण)वि.वि.सीएम ओम कदम(मुंबई)(3गुण);
शंतनू भांबुरे(पुणे)(3गुण) बरोबरी वि.सम्मेद शेटे(कोल्हापूर)(3गुण);
रणवीर मोहिते(पुणे)(3गुण) बरोबरी वि.एफएम सुयोग वाघ(अहमदनगर)(3गुण);
आयएम समीर कठमाळे(सांगली)(3गुण) वि.वि.स्नेहल भोसले(मुंबई)(2.5गुण);
प्रणव शेट्टी(मुंबई)(2.5गुण) बरोबरी वि.एफएम निखिल दिक्षित(पुणे)(2.5गुण);
सोहम दातार(पुणे)(3गुण) वि.वि.शिव शोमी(मुंबई)(2गुण);
एफएम अनिरुद्ध देशपांडे(पुणे)(3गुण) वि.वि.विकास शर्मा(पुणे)(2गुण);
अक्षय सावंत(पुणे)(2गुण) पराभूत वि.केतन बोरीचा(मुंबई)(3गुण);
डब्ल्यूआयएम सलोनी सापळे(पुणे)(3गुण) वि.वि.ध्रुव हळदणकर(मुंबई)(2गुण);
अक्षय बोरगांवकर(पुणे)(2गुण) बरोबरी वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(मुंबई)(2गुण).