दुसऱ्या सामन्यात डेक्कन जिमखानाचे 280धावांचे आव्हान; तुषार श्रीवास्तवची शतकी खेळी

Date:

पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

  • तिसऱ्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखानाच्या पहिल्या डावात 145धावा

पुणे- पीवायसी हिंदू  जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत तिसऱ्या दिवशी सुजित उबाळे(52-4), वैभव गोसावी(42-4)यांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 9 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवशी तुषार श्रीवास्तव(नाबाद 128)याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने 280 धावांचे आव्हान उभे केले आहे.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदानावर झालेल्या या तीन दिवसीय लढतीत आज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा डाव 5बाद 64धावांवरून पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात 122धावांची आघाडी मिळवली. व्हेरॉक संघाचा दुसरा डाव 38.3षटकात 137धावावर संपुष्टात आला. यात पवन शहाने एकाबाजूने लढताना 106 चेंडूत 72 धावांची खेळी केली. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून सुजित उबाळे(52-4), वैभव गोसावी(42-4), यश क्षीरसागर(8-2)यांनी सुरेख गोलंदाजी केली. 137धावात व्हेरॉक संघ संपुष्टात आल्यामुळे पहिल्या डावात 122धावांची आघाडी घेतलेल्या क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला विजयासाठी केवळ 15धावांचे लक्ष मिळाले. हे लक्ष क्लब ऑफ महाराष्ट्रने 6.3षटकात 1बाद 18धावा करून पूर्ण केले.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावरील दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवशी डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 85षटकात 5बाद 280धावा केल्या. यात तुषार श्रीवास्तवने 256 चेंडूत 18चौकार व 1षटकारांसह नाबाद 128 धावा, आशय पालकरने 94 चेंडूत नाबाद 36 धावा, स्वप्निल गुगळेने 28धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. डेक्कन व केडन्स यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावरील सामन्यात पहिल्या डावात पीवायसी हिंदू जिमखाना संघ 54.4षटकात 145धावावर संपुष्टात आला. यामध्ये अमेय भावेने(59धावा), करण जाधवने(37धावा) यांनी सहाव्या गडयासाठी 122 चेंडूत 66 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पूना क्लबकडून राजकमल चौहान(41-4), प्रशांत सिंग(53-3) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पूना क्लब संघाने आजदिवसअखेर 25षटकात 2बाद 75धावा केल्या. यात ऋषिकेश मोटकर नाबाद 32धावा, तर अजिंक्य नाईक नाबाद 2धावांवर खेळत आहे. पीवायसी व पूना क्लब यांच्यातील अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदान: पहिला डाव: 
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.2षटकात सर्वबाद 127धावा(मिझान सय्यद 40(63,4×4,1×6), शुभम तैस्वाल 34(37,5×4), रोहित जना 16(48), पवन शहा 15(19), सुजित उबाळे 17.5-43-6, सय्यद आतिफ जमाल 2.3-9-1, वैभव गोसावी 13-38-1)वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 82.2षटकात सर्वबाद 249धावा(राजवर्धन उंडरे 18, संकेत चव्हाण 25, यश क्षीरसागर 43(100,6×4), सुरज शिंदे 35(72,6×4), सुजित उबाळे 28(39,6×4), सय्यद आतिफ जमाल 26, कार्तिक पिल्ले 20-41-3, मनोज यादव 21-62-2, शुभम तैस्वाल 12-45-2); क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे पहिल्या डावात 122धावांची आघाडी;

दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 38.3षटकात सर्वबाद 137धावा(पवन शहा 72(106,7×4), ओम भोसले 14,शुभम तैस्वाल 14, सुजित उबाळे 12.5-52-4, वैभव गोसावी 10.1-42-4, यश क्षीरसागर 2-8-2)पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 6.3षटकात 1बाद 18धावा(देवदत्त नातू नाबाद 12, राजवर्धन उंडरे नाबाद 4, अॅलन रॉड्रिगेस 3-4-1);सामनावीर-सुजित उबाळे; क्लब ऑफ महाराष्ट्र 9 गडी राखून विजयी;

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 85षटकात 5बाद 280धावा(तुषार श्रीवास्तव नाबाद 128(256,18×4,1×6), आशय पालकर नाबाद 36(94,5×4,1×6), स्वप्निल गुगळे 28, शुभम नागवडे 16, धीरज फतंगरे 13, शुभम हरपाळे 14-39-2, यतीन मंगवानी 11-33-1) वि.केडन्स: ;

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 54.4षटकात सर्वबाद 145धावा(अमेय भावे 59(143,8×4), करण जाधव 37(76,6×4), अभिषेक परमार 17, राजकमल चौहान 14.4-41-4, प्रशांत सिंग 18-53-3)वि.पूना क्लब: 25षटकात 2बाद 75धावा(यश नाहर 33(23,7×4), ऋषिकेश मोटकर नाबाद 32(77,6×4), दिव्यांग हिंगणेकर 6-14-1, आदित्य दावरे 5-19-1);

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज विचारात घेऊन बहृत आराखडा तयार करा

वीज उपकेंद्राच्या जागेसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना सोकारे-बोर्डीकर...

लोणीकंदमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा; अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमण...