पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सुहेल श्रीखंडे(194धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्रविरुद्धच्या अनिर्णित लढतीत पहिल्या डावाच्या अधिक्यावर पाच गुणांची कमाई केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या या दोन दिवसीय लढतीत काल क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 81षटकात 8बाद 312धावावर संघाचा डाव घोषित केला. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने कालच्या बिनबाद 40धावावरून आज डावास सुरुवात केली. यात सुहेल श्रीखंडे याने दमदार खेळी करत 25 चौकार व 5षटकारांच्या मदतीने 187चेंडूत 194धावा केल्या. सुहेल श्रीखंडे(63धावा) व यश बांबोळी(45धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 144चेंडूत 108धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यश बांबोळी क्लब ऑफ महाराष्ट्रच्या विराज दारवाटकरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर सुहेल श्रीखंडे(100धावा) व अजय बोरुडे(41धावा) यांनी पाचव्या गड्यासाठी 178चेंडूत 141धावा करून संघाला 75धावांची आघाडी मिळवून दिली. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून शुभम मेड(63-3), राजवर्धन उंडरे(74-3), अथर्व जोशी(44-1), विराज दारवाटकर(7-1)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 81षटकात 8बाद 312धावा(डाव घोषित)(विराज दारवाटकर 104(161,12×4,2×6), राजवर्धन उंडरे 74(127,6×4,1×6), स्वप्निल 61(74), सुरज फरगडे 25, आदित्य 17, रेहान खान 20-60-3, आर्यन बांगले 23-104-4, धीरेन मते 9-30-1)वि.डेक्कन जिमखाना: 83.5षटकात सर्वबाद 387धावा(सुहेल श्रीखंडे 194(187,25×4, 5×6), अथर्व वणवे 46(47,9×4), यश बांबोळी 45(82,6×4), अजय बोरुडे 41(79,4×4), यश बोरामनी 26(45), शुभम मेड 19-63-3, राजवर्धन उंडरे 12.5-74-3, अथर्व जोशी 14-44-1, विराज दारवाटकर 2-7-1);सामनावीर-सुहेल श्रीखंडे; पहिल्या डावात डेक्कन जिमखाना संघाकडे 75धावांची आघाडी.