दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे पूना क्लबपुढे 256 धावांचे आव्हान;

Date:

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू  भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी यज्ञेश मोरे 91(155,16×4), अद्वैत मुळ्ये 33 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघापुढे 256 धावांचे आव्हान उभे केले आहे.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 67षटकात 7बाद 256धावा करून संघाचा डाव घोषित केला. यात यज्ञेश मोरेने 155 चेंडूत सयंमपूर्ण फलंदाजी करताना 16 चौकारांसह 91धावा, अद्वैत मुळ्येने 99चेंडूत 33 धावा करून चांगली सुरुवात करून दिली. यज्ञेश मोरे व अद्वैत मुळ्ये यांनी दुसऱ्या गडयासाठी 193चेंडूत 86धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर सुरज गोंड 23, टिळक जाधव 22, यश जगदाळे 21, विकी ओस्तवाल नाबाद 20यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. पूना क्लबकडून दर्शित लुंकड 49 धावात 5 गडी बाद करून सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पूना क्लब संघाने आजदिवसअखेर 21षटकात 3बाद 57धावा केल्या.यात वरद कुलकर्णी नाबाद 28धावा, निश्चय नवले नाबाद 6 धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व पूना क्लब यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 67षटकात 7बाद 256धावा(डाव घोषित)(यज्ञेश मोरे 91(155,16×4), अद्वैत मुळ्ये 33(99), सुरज गोंड 23(22), टिळक जाधव 22(33), यश जगदाळे 21(35), विकी ओस्तवाल नाबाद 20, दर्शित लुंकड 13-49-5, मुकुंद गायकवाड 12-67-2) वि.पूना क्लब: 21षटकात 3बाद 57धावा(कमल पुनिया 18(15), वरद कुलकर्णी नाबाद 28(56), निश्चय नवले नाबाद 6, टिळक जाधव 6-22-2, विकी ओस्तवाल 8-5-1);
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीरा’ला पुण्यात आज प्रारंभ

आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती पुणे : आरोग्य सेवांच्या डिजिटल...

राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा: नसीम खान

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणी केली नाही तर...