पीवायसी बुद्धिबळ लीग 2019 स्पर्धेत गोल्डन किंग व 7 नाईट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

Date:

पुणे, 3 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत गोल्डन किंग,  7नाईट्स या संघांनी आपापल्या गटात अव्वल स्थान कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत निखिल चितळे, तन्मय चितळे, शुभांकर मेनन आणि  सारंग उर्धवर्षे  यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर 7 नाईट्स संघाने किंग्ज 64  संघाचा  4-2 असा पराभव केला. 7 नाईट्स संघाने राउंड  रॉबिन फेरीत 4 विजय, 1 पराभवासह 23.5 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, गोल्डन किंग  व वाडेश्वर विझार्डस यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. गोल्डन किंग संघाने 3 विजय व 1 बरोबरीसह 20.5 गुण पटकावत अंतिम फेरीत धडक मारली.

अन्य लढतीत द बिशप्स चेक संघाने गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाचा 4-2 असा पराभव करून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:

 गोल्डन किंग बरोबरी वि.वाडेश्वर विझार्डस 3-3(हेमंत उर्धवर्षे वि.वि.आशिष राठी 1-0; प्रियदर्शन डुंबरे पराभूत वि. अक्षय साठ्ये 0-1; अजिंक्य जोशी वि.वि.अमोल मेहेंदळे 1-0; निरंजन गोडबोले वि.वि.रोनित जोशी 1-0; अर्णव कुंटे पराभूत वि.कौस्तुभ वाळिंबे 0-1; अभिषेक देशपांडे पराभूत वि.कुणाल भुरट 0-1);

किंग्ज 64 पराभूत 7 नाईट्स 2-4(राजन जोशी पराभूत वि. निखिल चितळे 0-1; जय केळकर पराभूत वि.तन्मय चितळे 0-1; आदित्य लाखे वि.वि.आदित्य भट 1-0; अद्वैत जोशी पराभूत वि.शुभांकर मेनन 0-1; रोहीन लागू पराभूत वि. सारंग उर्धवर्षे  0-1; राघव बर्वे वि.वि.विजय देशपांडे 1-0);

गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स पराभूत वि.द बिशप्स चेक 2-4(अमेय कुलकर्णी पराभूत वि.अश्विन त्रिमल 0-1; अमोद प्रधान पराभूत वि. चारू साठे 0-1; राजशेखर करमरकर पराभूत वि. अभिषेक गोडबोले 0-1; ईशान लागू पराभूत वि. किरण खरे 0-1; विजय ओगळे वि.वि.असिम देवगांवकर 1-0; पराग चोपडा वि.वि.केतन रावल 1-0).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ते वितळले, रुळ उखडले; युरोपमध्ये उष्णतेने मोडले सर्व विक्रम, आठवडाभरात 1300 हून अधिक मृत्यू

युरोप | युरोप सध्या विक्रमी उष्णतेच्या तडाख्यात सापडला असून स्वित्झर्लंड,...

जबरी चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १.३० लाखांचे चार मोबाईल जप्त

पुणे | प्रतिनिधी कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर बसथांब्याजवळ दूध आणण्यासाठी पायी...

आता जलवाहिनी दुरुस्ती: पर्वती परिसरासह दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद…

पुणे | प्रतिनिधी पर्वती HLR गोल टाकीपासून पद्मावती पंपिंग स्टेशनकडे...

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ

• मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम मुंबई,...