Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हाईन स्टार्स, मेटा स्कुल संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

पुणे,25 एप्रिल 2018:डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हाईन स्टार्स, मेटा स्कुल या संघांनी सलग दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आदिती गायकवाडच्या नाबाद 67धावांसह श्रावणी कदम(4-5)च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने रिग्रीन संघाचा 8गडी राखून पराभव करत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. रिग्रीन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20षटकात 7बाद 120धावा केल्या. यात किरण नवगिरेने 50धावा, तेजल हसबनीसने 24धावा, श्रद्धा पाखरकरने नाबाद 22धावा केल्या. डिव्हाईन स्टार्सच्या श्रावणी कदमने 5धावांत 4गडी बाद करून रिग्रीन संघाला 120धावांवर रोखले. डिव्हाईन स्टार्स संघाने हे आव्हान 16.3षटकात 2बाद 121धावा करून पूर्ण केले. आदिती गायकवाडने 53 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 67धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.आदितीला  वैष्णवी रावलीयाने 27धावा व भारती फुलमाळीने 12धावा काढून सुरेख साथ दिली.सामन्याची मानकरी आदिती गायकवाड ठरली.

दुसऱ्या सामन्यात रोहिणी मोरे (नाबाद 68)हिने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मेटा स्कुल संघाने ट्रँटर संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मुक्ता मोगरे 50, अंकिता भोंगाडे 29, माधुरी आघाव 24, नेहा चावडा 22यांनी केलेल्या धावांच्या जोरावर ट्रँटर संघाने 20षटकात 6बाद 149धावा केल्या. मेटा स्कुलच्या पूनम खेमनार(2-22), कल्याणी चावरकर(1-19), उत्कर्षा पवार(1-19), सोनाली शिंदे(1-30), इशा पठारे(1-24)यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. 149धावांचे आव्हान मेटा स्कुल संघाने 18.5षटकात 3गड्यांच्या बदल्यात 151धावा काढून पूर्ण केले. यामध्ये रोहिणी मोरेने 52चेंडूत 8चौकार व 2षटकारांसह नाबाद 68काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. कल्याणी चावरकरने नाबाद 24धावा, पूनम खेमनारने 19धावा व उत्कर्षा पवारने 14धावा केल्या. सामनावीर हा ‘किताब रोहिणी मोरेने पटकावला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

रिग्रीन: 20षटकात 7बाद 120धावा(किरण नवगिरे 50(55,4×4), तेजल हसबनीस 24(16,4×4), श्रद्धा पाखरकर नाबाद 22(20,2×4), श्रावणी कदम 4-5)पराभूत वि.डिव्हाईन स्टार्स: 16.3षटकात 2बाद 121धावा(आदिती गायकवाड नाबाद 67(53,6×4), वैष्णवी रावलीया 27(32,3×4), भारती फुलमाळी 12(9), रोहिणी मोने 1-25);सामनावीर-आदिती गायकवाड;

ट्रँटर: 20षटकात 6बाद 149धावा(मुक्ता मोगरे 50(38,9×4), अंकिता भोंगाडे 29(31,3×4), माधुरी आघाव 24(18,2×4), नेहा चावडा 22(17,4×4), पूनम खेमनार 2-22, कल्याणी चावरकर 1-19, उत्कर्षा पवार 1-19, सोनाली शिंदे 1-30, इशा पठारे 1-24) पराभूत वि.मेटा स्कुल: 18.5षटकात 3बाद 151धावा(रोहिणी मोरे नाबाद 68(52,8×4,2×6), कल्याणी चावरकर नाबाद 24(26,3×4), पूनम खेमनार 19(14,2×4,1×6), उत्कर्षा पवार 14(16), काजल निकाले 1-16, मुक्ता मोगरे 1-27, निसर्ग तेहवाडे 1-30);सामनावीर-रोहिणी मोरे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र...

 पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर...

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबई दि. 20 :...