पुणे-नुकत्याच झालेल्या नीट च्या परीक्षेमध्ये चाटे स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,चाटे क्लासेस ,चाटे शिक्षण समूह या सर्व विद्यार्थ्यांनी नीट च्या परीक्षेत उत्तुंग असे यश मिळविले .या परीक्षेला भारतातून सुमारे 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात .आणि प्रत्येक विद्यार्थी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असतो .यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर निकालाची वा अन्य कसलीही वाट न पहाता ,विद्यार्थी अकरावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो. अकरावी आणि बारावी या २ वर्षामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागते ,एमसीक्यू ची तयारी करावी लागते .आणि तो विद्यार्थी २ वर्षे सतत देश पातळीवरच्या परीक्षांची तयारी करत असतो .आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आज हे यश येथे संपादन करता आले आहे. आज चाटे स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज (निवासी महाविद्यालय )मधील आकाश कोल्हेयाने ६३० गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. आकाश कोल्हे याचे आई वडील निशा आणि डॉ.प्रशांत कोल्हे यांनी तसेच आज चाटे शिक्षण समुहाचे प्राध्यापक फुलचंद चाटे यांनी आज सातारा रस्त्यावरील चाटे क्लासेस येथे एकमेकांचे अभिनंदन केले . आणि यावेळी कोळे दाम्पत्यांने चाटे सर यांना धन्यवाद दिले . सायली निकम, आदी यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांनी व त्यांच्या पालकांनी येथे आज प्रत्यक्षात चाटे शिक्षण समूहाच्या कार्यालयात शिक्षक व मान्यवरांना भेटून आनंद व्यक्त केला .या सर्वांना पुढील वाटचालीस चाटे समूहाच्या वतीने शुभेछ्या देण्यात आल्या .