बारामती :- बारामती तालुक्यातील तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर, ग्रामीण पोलीस स्टेशन येथील जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत वाळुचा फेर जाहिर लिलाव सोमवार दिनांक 14.05.2018 रोजी सकाळी 11.00 वा. तहसिल कार्यालय दालन,बारामती येथे घेण्यात येणार आहे.ज्यांचेकडून सर्वोच्च् बोलीनुसार बोली प्राप्त होतील त्यांनाच वाळु वाहतुक अधिकार देण्यात येतील. लिलावात भाग घेवू इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीला लिलाव सुरु होण्याच्या किमान 1 तासापूर्वी जाहिर अनामत रक्कम रुपये 50,000/- रोखीने भरणे आवश्यक आहे. लिलावधारकाने नियमित आयकर भरत असल्याचा पुरावा, पॅन कार्डाची छायांकित प्रत, विक्रीकर विभागाचा टिन नंबर असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केले नंतरच लिलावधारकाला लिलावात सहभागी होता येईल.वाळू लिलाव भरताना संबंधिताने निवासाचा पुरावा, वाहन चालविणेचा परवाना यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.लिलावाची सरकारी किंमत यांचा तपशील पुढीलप्रमाणे – पोलीस निरिक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन,सहा.पोलीस निरिक्षक, वडगाव नि. सहा.पोलीस निरिक्षक,ग्रामीण पोलीस स्टेशन व सहा.पोलीस निरिक्षक, माळेगाव बु. पोलीस स्टेशन येथील एकूण 158.02 ब्रास वाळू निश्चित केलेली अपसेट प्राईस6,37,966.2/- रुपये आहे. लिलावाच्या अटी / शर्ती, जागेचा तपशील इत्यादी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय, बारामती येथे पहावयास मिळेल, असे तहसिलदार श्री.हुनमंत पाटील यांनी एका पत्रकान्वये कळवले आहे.