पुणे, २० सप्टेंबर २०२२: ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेलियन सरकारी एजन्सी) द्वारे स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शो चे मंगळवारी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील नेत्यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
भारतीय विद्यार्थ्यांच्या जागतिक पातळीवरील करिअरला आकार देण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या उपक्रमांवर या कार्यक्रमा प्रकाश टाकण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांसाठी २६ हून अधिक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी होती.
१२ ते २२ सप्टेंबर या कालावधीत कोची, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि जयपूरसह इतर पाच भारतीय शहरांमध्ये स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शो कार्यक्रम आयोजित केले जातील.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे शिक्षणातील उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थी, पालक, शिक्षण सल्लागार आणि संस्था प्रमुखांना यात सहभागी करून घेण्याची सुविधा होती. ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक असलेल्या प्रमुख पैलूंचाही यात समावेश होता.
या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांसाठी कोणता अभ्यासक्रम सर्वोत्तम आहे हे त्यांना ठरवायला मदत करण्यासाठी करिअर मॅचर स्क्रीन होती. या साधनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांशी जुळणारे अभ्यासक्रम सादरीकरण समजायला मदत झाली. अनेक विद्यार्थ्यांनी मग त्यानुसार सहभागी विद्यापीठांशी संपर्क साधला.
या उपक्रमांबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन सरकारच्या ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (ऑस्ट्रेड)चे इंडिया डिजिटल एज्युकेशन हबचे संचालक श्री विक सिंग म्हणाले, “ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेण्याबाबत विचार करताना विद्यार्थी सर्वोत्तम निर्णय घेत आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही भारतीय विद्यार्थ्यांसोबत जवळून काम करतो. स्टडी ऑस्ट्रेलिया रोड शोने विद्यार्थी, पालक, शिक्षण सल्लागार आणि संस्था प्रमुखांना अद्ययावत, विश्वासार्ह आणि संबंधित माहिती प्रदान केली. ऑस्ट्रेलिया जागतिक दर्जाचे शिक्षण, मजबूत करिअर मार्ग आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतुलनीय जीवनशैली पुरविते.”
रोड शोमध्ये सहभागींना स्टुडंट व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया आणि ऑस्ट्रेलियन व्हिसा आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून ग्रॅज्युएट रूट याविषयी स्पष्ट उत्तरे देण्यात आली. यावेळी ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती, विद्यार्थी जीवन आणि देशातील सुरक्षा याबद्दल तपशीलवार माहिती देखील दिली.
अलीकडेच ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सध्याच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांची रोजगारक्षमता कौशल्ये वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनचा ‘द स्टडी ऑस्ट्रेलिया इंडस्ट्री एक्सपिरीअन्स प्रोग्रॅम (SAIEP) सादर करण्यात आला.
गेल्या काही वर्षांमध्ये, जागतिक दर्जाचे शिक्षण, अभ्यासानंतरच्या कामाच्या संधी आणि राहणीमानाच्या उच्च गुणवत्तेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याचा पर्याय निवडत आहेत. डिसेंबर २०२१ च्या मध्यापासून २२ जुलै २०२२ पर्यंत सीमा पुन्हा उघडल्यापासून २६०,००० हून अधिक विद्यार्थी व्हिसा धारक ऑस्ट्रेलियात आले.
स्टडी ऑस्ट्रेलियाबद्दल अधिक माहितीसाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठबळाबद्दल अधिक माहिती https://www.studyaustralia.gov.au/india वर उपलब्ध आहे.