पुणे- इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ली. आणि अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालय यांच्या संयुक्त कॉन्क्रीटडे निमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.नितीन करमळकर माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,श्री युसुफ इनामदार चेअरमन इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर, श्री उमेश मगर, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांचे शुभ हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना डॉ.करमळकर यांनी काँक्रीटचे विविध प्रकार, क्युअरिंगच्या विविध पद्धती, काँक्रीटची गुणवत्ता तपासणे, काँक्रीट मिश्रण,प्रीकास्ट, क्रीट स्ट्रक्चर्सचे वॉटरप्रूफिंग, इंडस्ट्रियल फ्लोअरिंग, काँक्रीट टिकाऊपणा आणि डिझाइन चे प्रकार, नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती, नवीन काँक्रीट साहित्य आणि काँक्रीटचा मोठ्या प्रमाणात वापर यासारख्या काही विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून सिमेंट शिवाय ड्युरेबल साहित्य निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून देशाच्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी आपल्या कल्पनांचा वापर नवसंशोधनासाठी करण्याचे आवाहन या प्रसंगी केले. महाविद्यालयाने या प्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प स्पर्धा, पेपर प्रेझेटेशन, पोस्टर प्रेझेटेशन ,ग्रीन कॉन्क्रीट, क्यूब कॉम्पीटीशन, आय स्टिक ब्रिज कॉम्पीटीशन , इनोव्हेटी आयडीया कॉम्पीटीशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांसाठी एकूण ५००००० /- रक्कमेची रोख पारितोषिके आहेत. या विविध स्पर्धांसाठी महाराष्ट्रातून २०० हून अधिक तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी व आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या १०००पेक्षा ज्यास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी डॉ. नितीन करमळकर, श्री, युसुफ इनामदार, सुचेता कलावार, उमेश मगर, रमेश कुलकर्णी, दिपक मोडक, समीर बापट, प्रतिक मगर, शशिकांत किल्लेदार पाटील, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.अभय शेलार सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्नेहा साळवेकर व प्रा. नेहा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचेता कलावार सेक्रेटरी इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर यांनी केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाने आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.